IMPIMP

Deepak Kesarkar | ‘राज्यपालांबद्दलची भूमिका केंद्राला कळवली, पण जर भाजपबद्दल जर इतकी पोटदुखी असेल, तर…’

by nagesh
Deepak Kesarkar | deepak kesarkar sharp attck on uddhav thackeray over governor stance

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र सरकारवर टीका केली. तसेच,
शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्याबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर हल्ला केला. केंद्राने हे सॅम्पल माघारी न्यावे नाहीतर महाराष्ट्र बंद
करू, असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला होता. आता, शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते, शिक्षणमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक
केसरकर (Deepak Kesarkar) यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे. भाजपबद्दल जर इतकी पोटदुखी असेल, तर मुंबई पालिकेत पाठिंबा का
घेतला? अशी विचारणा दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

उद्धव ठाकरेंच्या टीकेबद्दल बोलताना केसरकर (Deepak Kesarkar) म्हणाले, “महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कधीही सहन करणार
नाही. महाराष्ट्राच्या राज्यपालांबद्दलची भूमिका मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी केंद्राला कळवली आहे. उद्धव ठाकरे यांची पोटदुखी वेगळी आहे.
त्यांना सत्ता गेल्याच दुःख आहे. महाराष्ट्राची ताकद कमी झाली की वाढवली, हे महाराष्ट्राची जनता ठरवेल. गेल्या सरकारपेक्षा आम्ही राज्याची ताकद
नक्कीच वाढवली आहे. आम्ही एका क्लिकवर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले आहेत.”

“ज्यांचं सरकार केंद्रात असतं त्यांच्या विचारसरणीची माणसं राज्यपाल म्हणून नेमली जातात,
मग त्यासाठी कुवत आणि पात्रता लक्षात घेतली जात नाही. त्यामुळे ज्यांना वृद्धाश्रमातही जागा नसते,
त्यांना राज्यपाल नेमलं जातं का?” असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला होता.
तसेच, केंद्राने हे सॅंपल परत न्यावं अन्यथा त्यांना महाराष्ट्राचा इंगा दाखवेल, असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला होता. दीपक केसरकर त्यासंबंधात बोलत होते.

Web Title :- Deepak Kesarkar | deepak kesarkar sharp attck on uddhav thackeray over governor stance

हे देखील वाचा :

Ranveer Singh | बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहचा बिग बॉस मराठी मधील ‘या’ स्पर्धकाला पाठिंबा; व्हिडिओ शेअर करत दिल्या शुभेच्छा

Sharad Pawar On Shinde-Fadnavis Govt | शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार का? शरद पवारांनी दिले उत्तर; म्हणाले – ‘मी काही ज्योतिषी नाही’

CM Eknath Shinde On Uddhav Thackeray | ‘बाळासाहेबांचं हिंदुत्व, त्यांचे विचार मोडूनतोडून टाकणाऱ्यांना…’; उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर एकनाथ शिंदेंच्या प्रत्युत्तर

Related Posts