IMPIMP

Deepak Kesarkar | ‘त्या’ विधानाबद्दल केसरकरांकडून शरद पवारांची जाहीर माफी, म्हणाले…

by nagesh
Deepak Kesarkar | deepak kesarkar attack on ncp over shivsena split in kolhapur

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्याबद्दल मी कधीही अपशब्द काढले नाहीत. माझ्या जीवनाच्या जडण घडणीत ज्या मोठ्या नेत्यांचा वाटा आहे त्यापैकी एक शरद पवार असल्याचे वक्तव्य शिंदे गटाचे प्रवक्ते (Shinde Group Spokesman) दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केलं आहे. आवश्यकता असेल तर मी पवार साहेबांच्या घरी जाऊन त्यांची दिलगीरी व्यक्त करेल असेही दीपक केसरकर (Deepak Kesarkar) म्हणाले. शरद पवार हे माझ्या गुरुसमान आहेत. त्यांच्या विरोधात मी बोलू शकत नाही. गैरसमज झाला असेल तर जाहीर दिलगिरी व्यक्त करेन असेही ते म्हणाले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

शरद पवार यांच्याबाबत माझ्याकडून कधीच एकही अपशब्द येऊ शकत नाही. शिवसेनेत (Shivsena) जी फूट झाली होती, त्यासंदर्भात मी काही वक्तव्य केली होती. ही घडलेली एक वस्तूस्थिती होती. या परिस्थितीचा मी उल्लेख केला. तसेच 2014 साली भाजप (BJP) आणि शिवसेनेने वेगवेगळ्या निवडणुका लढवल्या. त्यानंतर जे सरकार स्थापन झालं, त्यावेळी पवार साहेबांनी भूमिका जाहीर केली होती. त्यावेळी त्यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा देण्याचे जाहीर केले होते. या घटनांचा आणि पवार साहेबांबद्दल चुकीचं वक्तव्य करण्याचा काही संबंध येत नसल्याचे दीपक केसरकर (Deepak Kesarkar) म्हणाले. पवार साहेब महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आहेत. प्रत्येकाला त्यांच्याविषयी आदर आहे. चुकून जर माझ्याकडून त्यांच्याबद्दल काही अपशब्द गेला असेल तर त्यांच्याबद्दल जाहीर दिलगिरी व्यक्त करतो असेही ते म्हणाले.

जितेंद्र आव्हाड भेटायला आले होते पण…

पवारसाहेबांच्या वतीने मला भेटायला आल्याचे वक्तव्य जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केले आहे.
आव्हाड मला भेटायला आले होते हे खरं आहे. मात्र, ते नारायण राणे (Narayan Rane) यांच्या मुलाचा प्रचार करा हे सांगायला आले होते.
ते अजिबात पवार साहेबांचा निरोप घेऊन माझ्याकडे आले नव्हते असेही केसरकर म्हणाले.
पवार साहेब ज्या दिवशी सावंतवाडीला आले त्या दिवशी मी माझ्या मतदारसंघात होतो. त्यावेळी मी माझा राजीनामा पवार साहेब यांच्याकडे दिला.
तो अत्यंत नम्रपणाने दिल्याचे केसरकरांनी सांगितले. मी तुमच्यामुळे आमदार आहे.
मात्र, मी राणे यांच्या मुलाचा प्रचार करु शकत नसल्याचे पवारसाहेबांना सांगितल्याचे केसरकर म्हणाले.
मी तुमच्याबरोबर येऊ शकत नाही म्हणून आमदारकीचा राजीनामा देत असल्याचे पवारसाहेबांना सांगितल्याचे केसरकरांनी सांगितले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Deepak Kesarkar | mla deepak kesarkar comment on ncp chief sharad pawar

हे देखील वाचा :

Pune Crime | बदनामीकारक संदेश पाठवून तरुणाची 13 लाखांची फसवणूक

Pune Municipal Corporation-PMC | पुणे महापालिकेकडून 68 रुग्णालयांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक डोस उपलब्ध; 18 ते 59 वर्षे वयोगटातील नागरिकांना डोस मोफत

CM Eknath Shinde | ‘आता आपलं सरकार, शिवसैनिकांवर अन्याय होऊ देणार नाही’ – एकनाथ शिंदे

Related Posts