IMPIMP

Deepak Kesarkar | राणेंकडून आदित्यची बदनामी, उद्धव ठाकरे राजीनामा देणार होते; दीपक केसरकरांचा गौप्यस्फोट

by nagesh
Deepak Kesarkar | The recruitment process of Scheduled Tribes category will be implemented in a time-bound manner, informed Deepak Kesarkar in the Legislative Council

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात (Actor Sushant Singh Rajput Case) युवा नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची बदनामी केली गेली. यात भाजपचे नेते (BJP Leader) आणि मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचाही सहभाग होता. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या कानावर ही वस्तुस्थिती घालून राणे काय बोलत आहेत हे सांगितले. मोदींनीही प्रतिसाद दिला. त्यानंतर मोदी आणि ठाकरे यांच्यात संवाद सुरु झाला. नंतर त्यांची भेट झाली. मोदी यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री पदाचा राजीनामा (Resignation) देणार होते, असा गौप्यस्फोट शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केला आहे. शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील खोट्या आरोपांचा मुद्दा उपस्थित केला.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

दीपक केसरकर (Deepak Kesarkar) म्हणाले, सुशांत सिंह प्रकरणात झालेल्या आरोपांमध्ये आणि वस्तुस्थितीत जमीन आस्मानाचा फरक होता. या प्रकरणात आदित्य ठाकरे यांची बदनामी (Defamation) करण्यात आली. त्यामध्ये नारायण राणे यांनी घेतलेल्या पत्रकारपरिषदांचा हात होता. त्यांनी भाजपच्या मुख्यालयातून पत्रकार परिषदा घेतल्या होत्या. नारायण राणे यांच्या या आरोपानंतर उद्धव ठाकरे यांच्यावर प्रेम करणारे माझ्यासारखे शिवसेनेतील अनेक आमदार आणि नेते दुखावले गेले होते. मी याबाबत भाजपच्या नेत्यांना विचारणा केली तेव्हा त्यांनीही आमच्यातील बहुतांश आमदारांना राणे यांच्याकडून आदित्य ठाकरे यांच्यावर केले जाणारे आरोप पसंत नसल्याचे, मला सांगण्यात आले होते. त्यानंतर मी माझ्या वैयक्तिक संपर्कातून पंतप्रधानांकडे गेलो.

मी सगळा प्रकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानावर घातला. तेव्हा त्यांनी माझे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात डायलॉग सुरु झाला होता. हे दोन्ही मोठे नेते आहेत. आम्ही या दोघांचे म्हणणे व्यवस्थितपणे एकमेकां पर्यंत पोहोचवत होतो. या संपूर्ण प्रकरणात पंतप्रधान मोदी यांनी एखाद्या कुटुंबप्रमुखाप्रमाणे भूमिका निभावली. त्यांच्याकडून येणाऱ्या संदेशामधून ती बाब प्रतित होत होती. यामध्ये मोदींना बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्याविषयी असणारा आदरही दिसून येत होता, असे केसरकर यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे म्हणाले होते की, मला माझ्या पदापेक्षा तुमच्याशी असलेले कौटुंबिक संबंध जपण्यात मी जास्त महत्त्व देतो.
त्याचवेळी ते आपल्या पदाचा त्याग करणार होते. ते मुंबईत आल्यानंतर आपल्या कार्यकर्त्यांच्या कानावर ही गोष्ट घालणार होते.
ही गोष्ट फक्त उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) आणि मलाच माहिती होतं.
पण मधल्या काळात भाजपच्या बारा लोकांचं निलंबन झालं.
त्यावेळी भाजपकडून निरोप आला होता की आपली बोलणी सुरु आहे आणि असं निलंबन योग्य नाही.
दरम्यान, राणेंची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली.
त्यानंतर उद्धव ठाकरे आणि पंतप्रधानांची बोलणी थांबल्याचे, दीपक केसरकर यांनी सांगितले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Deepak Kesarkar | narayan rane conspiracy to defame aditya thackeray serious accusation of dipak kesarkar

हे देखील वाचा :

Climbing Stairs | तुम्हाला जिने चढताना धाप लागते का? या पद्धतींनी मिळेल आराम

Aarey Metro Car Shed | सुप्रीम कोर्टाचा शिंदे सरकारला दणका, पुढील सुनावणीपर्यंत ‘आरे’तील एकही झाड न तोडण्याचे आदेश

Warm Water Benefits | गरम पाण्याचे हे 5 फायदे तुम्हाला माहितीच नाहीत, अनेक आजारांवर आहे रामबाण उपाय

Related Posts