IMPIMP

Deepak Kesarkar On Sanjay Raut | ‘संजय राऊतांना मतदान देऊन चूक झाली, त्यांनी राजीनामा द्यावा’ – दीपक केसरकर

by nagesh
Deepak Kesarkar | your luxury houses cars have come from khake deepak kesarkars counter attack on sanjay raut

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Deepak Kesarkar On Sanjay Raut | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह बंडखोर आमदारांनी बंडाचं
मोठं पाऊल उचलल्याने राज्यातील सरकारला मोठा धक्का बसला आहे. अशातच शिवसेना (Shivsena) आणि शिंदे गट यांच्यात मोठा राजकीय संघर्ष
पाहायला मिळत आहे. बंडखोर आमदारांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आक्रमक झालेत.
राऊत बंडखोर आमदारांवर टीका करतानाच याला शिंदे गटातील बंडखोर आमदार दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे. (Deepak Kesarkar On Sanjay Raut)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

दीपक केसरकर म्हणाले, “संजय राऊतांना आमच्यावर टीका करण्याचा कोणताही अधिकार नाही. संजय राऊत यांना राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान करुन आमची चूक झाली आहे. त्यांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवावी असं ते ते म्हणाले. आज बाळासाहेब ठाकरे असते तर संजय राऊतांना बाहेर काढलं असतं. बाळासाहेब असते तर भाजपसोबतची युती तुटलीच नसती,” असं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.

पुढे बोलताना केसरकर म्हणाले, “आमच्या बाजूने बहुमत आहे. अंतिम विजय हा सत्याचा होणार आहे.
आम्हाला कोर्टात न्याय मिळेल असं म्हणत आमच्या पार्टीचं अस्तित्व कायम आहे. एकनाथ शिंदे हेच आमचे नेते असल्याचं ते म्हणाले.
उपसभापतींनी चुकीचे निर्णय दिले आहेत. 55 पैकी 14 ते 15 लोक घेऊन तुम्ही पक्षाच्या नेत्याला काढू शकत नसल्याचे केसरकर म्हणाले.
आपले सहकारी मंत्री जर इतर ठिकाणी गेले तर राज्याचा कारभार सुरळीत चालवणे मुख्यमंत्र्यांचे कर्तव्य आहे.
त्यांनी गुवाहाटीला गेलेल्या मंत्र्यांची खाती इतर मंत्र्यांकडे देऊन त्यांचे कर्तव्य केल्याचं,” केसरकर यांनी म्हटलं आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

दरम्यान, “राऊत आधी टीका करतात आणि परत सावरण्याचा प्रयत्न करतात.
आधी ते शिंदे साहेबांना काढून टाका म्हणत होते, त्यानंतर ते त्यांची समजूत काढायला मिलिंद नार्वेकरांना पाठवतात.
त्यांचे नेहमी असेच असते, त्यांचे नेहमी टायमिंग चुकते. तर, संजय राऊतांनी आमच्यावर अत्यंत खालच्या शब्दात टीका केली.
तुमच्याकडे थोडीशी जरी नितीमत्ता असेल तर तुम्ही त्या राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्या
आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे मतदान घेऊन निवडून या,” असा टोला देखील केसरकरांनी लगावला आहे.

Web Title :- Deepak Kesarkar On Sanjay Raut | mla deepak kesarkar criticize on shivsena leader sanjay raut over maharashtra political crisis

हे देखील वाचा :

Pune Crime | माल खरेदी करुन पैसे एटीएममधून काढून देण्याचा बहाणा करुन पळून जाणाऱ्या चोरट्याला पकडले

Pune Crime | विक्रीसाठी गांजा बाळगणाऱ्यांकडून 20 किलो गांजा जप्त, जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनादिवशी गुन्हे शाखेची कारवाई

Pune Crime | इन्कम टॅक्सच्या नावाने पुण्यातील प्रसिध्द डॉक्टरकडे 10 लाखाची खंडणीची मागणी; जाणून घ्या प्रकरण

Related Posts