IMPIMP

Deepak Kesarkar | ‘गरज पडली तर काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत लढून शिंदे गटाला रोखू’ ! उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर दिपक केसरकर म्हणाले -‘आम्ही आधीपासूनच…’

by nagesh
Uddhav Thackeray | uddhav thackeray blunt questions directly to deepak kesarkar in nagpur winter session

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Party Chief Uddhav Thackeray) यांनी शिवसैनिकांना संघर्षासाठी तयार राहण्याचे आवाहन करताना गरज पडली तर काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी (NCP) या मित्रपक्षांसोबत निवडणूक (Election) लढू अशी घोषणा केली. या वक्तव्यावर शिंदे गटाचे प्रवक्ते (Shinde Group Spokesperson) दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यावर दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांना विचारण्यात आले असता त्यांनी थेट उत्तर देणं टाळताना आपण एक साधा कार्यकर्ता असल्याचे म्हटलं.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

गुरुवारी शिवसैनिकांसमोर (Shiv Sainik) बोलताना उद्धव ठाकरे यांनी गरज पडली तर पुन्हा शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणुका लढवतील आणि शिंदे गटातील आमदारांना (MLA) विधानसभेमध्ये जाण्यापासून रोखतील. गरज पडल्यास महापालिका आणि नगरपालिका निवडणुकींसाठीही (Municipal Election) एकत्र लढू असं ते म्हणाले. यावर आपलं काय मत आहे, असा प्रश्न दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांना विचारण्यात आले.

दीपक केसरकर म्हणाले, पक्षप्रमुख जे बोलतात त्याविरोधात बोलणं हे माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला शोभणारं नाही.
मात्र एक गोष्ट मी कायम सांगू इच्छितो की आम्ही बाळासाहेबांची (Balasaheb Thackeray) विचारसरणी मानणारे आहोत.
बाळासाहेबांनी सांगितले होते की, मी शेवटचा व्यक्ती असलो तरी काँग्रेसशी जुळवून घेणार नाही.
काँग्रेससोबत कधीच जाणार नाही. मी माझी विचारधार पुढे घेऊन जाईल. मी भगवा झेंडा घेऊनच वाटचाल करेन, असे ते म्हणाले होते.
आम्ही त्यांच्याच विचारांवर चालतोय. पक्षप्रमुख फार मोठे आहेत. ते काहीही बोलू शकतात.
मात्र ती बाळासाहेबांची विचारसरणी आहे की नाही यावर मी भाष्य करु शकतो.
मी पक्षप्रमुख यांच्या वक्तव्याविरोधात बोलणार नाही.

आम्ही आधीपासूनच सांगतोय की आम्ही बाळासाहेबांच्या विचारांवर चालतोय.
मोदी (Narendra Modi) सध्या जे नेतृत्व करत आहेत त्याचं कौतुक जगभरात होतेय.
त्यामुळे त्यांचाही आशीर्वाद या सरकारला आहे. महाराष्ट्राला पुढे घेऊन जायचं आहे.
मी काही विरोधी वक्तव्य केलं तर पक्षप्रमुखांनाही वाईट वाटेल. माझ्यावर प्रेम करणारा कार्यकर्ता असं कसं बोलला असं त्यांना वाटू शकतं. मी उद्धव ठाकरेंच्या मार्गदर्शनामध्ये जेवढं काम केलंय त्याहून अधिक काम शरद पवारांच्या (Sharad Pawar) मार्गदर्शनाखाली केले आहे.
मी हे जेव्हा बोलतो तेव्हा त्यांच्यावर टीका करण्यासाठी बोलत नसल्याचे केसरकर यांनी सांगितले.
तसेच मला त्यांच्याबद्दल फार आदर आणि प्रेम असल्याचे ते म्हणाले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Deepak Kesarkar | shivsena chief uddhav thackeray says if need will fight election in alliance with congress ncp eknath shinde rebel mla group first reaction

हे देखील वाचा :

Pune Pimpri Crime | कॅनडा विद्यापीठात प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने 13 लाखांची फसवणूक

PM Shinzo Abe | माजी PM शिंजो आबे यांच्या हत्येनंतर VVIP च्या 360 डिग्री सुरक्षेबाबत केंद्र सरकारने राज्यांना पाठवली नवी अ‍ॅडव्हायजरी

Diabetes Control Tips | डायबिटीजच्या रूग्णांनी शुगर कंट्रोल करण्यासाठी करावेत ‘हे’ 5 वर्कआऊट, जाणून घ्या

Related Posts