IMPIMP

Delhi High Alert | दिल्लीत हाय अलर्ट ! तहरिक-ए-तालिबानची बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी

by nagesh
Delhi High Alert | tehreek e taliban threatens of bomb blasts in delhi

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाDelhi High Alert | तहरिक – ए – तालिबानी (Tehreek – e – Taliban) या दहशतवादी संघटनेने (Terrorist Organization) दिल्लीत बॉम्बस्फोट (Bomb Blast) घडवण्याची धमकी (Threat) दिल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या दहशतवादी संघटनेने काही जणांना इमेलही (Email) पाठवली आहेत. त्यामुळे दिल्लीत हायअलर्ट (Delhi High Alert) जाती करण्यात आला आहे. सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करत सरोजिनी मार्केटसह (Sarojini Market) अन्य ठिकाणी दहशतवाद्यांना पकडण्यासाठी दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) शोध मोहिम सुरू केली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

राजधानी दिल्लीत बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी देणारे ई मेल काही जणांना आले होते. त्यांनी तात्काळ उत्तर प्रदेश पोलिसांकडे (Uttar Pradesh Police) तक्रार केली. दिल्ली पोलिसांनाही याबाबत माहिती देण्यात आली. या धमकीनंतर सरोजिनी मार्केटमधील व्यापाऱ्यांनी काही काळ दुकाने बंद ठेवली होती. दरम्यान, बंद ठेवण्याबाबत आपण कोणतेही आदेश दिले नसल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले. दिल्ली बरोबर (Delhi High Alert) उत्तर प्रदेशमध्येही सतर्कतेचा आदेश देण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांच्या दहशतवादी पथकाने (Terrorist Squad) तहरीक – ए – तालिबानने धमकीच्या ई – मेलमध्ये केलेल्या दाव्यांची सत्यता तपासण्याचे काम हाती घेतले आहे.

‘तहरिक’ची पाळेमुळे पाकिस्तानात
ज्या दहशतवादी संघटनेने धमकी दिली आहे, त्या तहरिक – ए – तालिबानची पाळेमुळे पाकिस्तानात (Pakistan) आहेत. 2014 मध्ये या संघटनेच्या दहशतवाद्यांनी पेशावरमधील शाळेवर हल्ला केला होता. त्यामध्ये 281 जणांचा मृत्यू झाला होता. महत्त्वाचे म्हणजे मृतात 132 मुलांचा समावेश होता. भारतातही या संघटनेचा हस्तक असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे पोलिसांनी कसून शोध मोहीम राबवली आहे.

Web Title :- Delhi High Alert | tehreek e taliban threatens of bomb blasts in delhi

हे देखील वाचा :

Pune Crime | कोंढव्यातील अट्टल गुन्हेगार नागपुर कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध ! MPDA कायद्यान्वये CP अमिताभ गुप्तांची आजपर्यंत 62 जणांवर कारवाई

Nitesh Rane | ‘नंदकिशोर चतुर्वेदीचा मनसुख हिरेन तर झाला नाही ना’ – नितेश राणे

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची माहिती ! 31 मार्चपूर्वी पूर्ण करा ‘हे’ काम; 4500 रुपयांचा थेट लाभ, जाणून घ्या

Related Posts