IMPIMP

Delhi High Court | घटस्फोटाबाबत दिल्ली उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

by nagesh
Delhi High Court | extra marital affaire and marriage if false allegations are made against the character of the spouse important decision given by the delhi high court

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाघटस्फोटाच्या (Divorce) निर्णयावर दाखल करण्यात आलेल्या अपिलावर दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court)  महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. विवाहबाह्य संबंधाचे (Extramarital Affairs) आरोप गंभीर असतात. ते गांभीर्याने घेतले पाहिजे. विवाह हे पवित्र नाते आहे. निरोगी समाजासाठी त्याची शुद्धता राखणे आवश्यक असल्याचे महत्त्वपूर्ण मत दिल्ली उच्च न्यायालयाचे (Delhi High Court ) न्यायमूर्ति विपिन सांघी (Justice Vipin Sanghi) आणि न्यायमूर्ति दिनेश कुमार शर्मा (Justice Dinesh Kumar Sharma) यांच्या खंडपीठाने (Bench) मांडत संबंधित महिलेचे अपील फेटाळले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

महिलेच्या क्रूरतेवरून पतीने (Husband) घटस्फोट मिळावा म्हणून कौटुंबिक न्यायालयात (Family Court) अर्ज केला होता. पतीच्या चारित्र्यावर महिला संशय (Husband’s Character Doubts) घेत होती त्यामुळे न्यायालयाने घटस्फोट मंजूर (Divorce Granted) केला होता. या निर्णयाविरोधात महिलेने दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court ) अपील दाखल केले होते.

संबंधित महिलेचा 2014 मध्ये विवाह झाला होता. त्यानंतर काही दिवसात दोघांमधील संबंध बिघडले.
त्यानंतर 2017 मध्ये पतीने क्रूरतेच्या आधारावर घटस्फोटासाठी दाखल केलेला अर्ज 2019 मध्ये मंजूर झाला.
संबंधित महिला सामाजिक विज्ञान शिक्षिका (Social Science Teacher) आहे तर तिचा पती हा एका कंपनीत असिस्टंट मॅनेजर (Assistant Manager) आहे.
या अपिलाच्या सुनावणीवेळी न्यायालयाने म्हटले की, महिलेने पतीवर लावलेले गंभीर आरोप सिद्ध करता आले नाही.
तसेच सासऱ्या विरुद्ध केलेला आरोपही सिद्ध करता आला नाही.
विवाह हे पवित्र नाते आहे. त्याची शुद्धता ठेवणे आवश्यक आहे.
अशाप्रकारे चारित्र्यावर खोटे आरोप करणे ही क्रूरता आहे. त्यामुळे कौटुंबिक न्यायालयाने दिलेल्या निर्णयात आम्ही दखल देण्याचे काही एक कारण नाही. असे खंडपीठाने स्पष्ट केले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

न्यायालयाने पुढे असे म्हंटले की, पती आणि त्याच्या वडिलांवर बिनबुडाचे आरोप करणे म्हणजे त्यांच्या चारित्र्याची हत्या आहे.
पती – पत्नीवर होणारे विवाहबाह्य संबंधाचे आरोप हे त्यांच्या चारित्र्य, दर्जा, प्रतिष्ठा आणि आरोग्यावर गंभीर आघात आहेत असे वारंवार सांगण्यात आले आहे.
अशा आरोपांमुळे मानसिक यातना आणि त्रास होतात. हे सर्व क्रूरतेसारखे असल्याचे मत न्यायालयाने नोंदवले.

Web Title :- Delhi High Court | extra marital affaire and marriage if false allegations are made against the character of the spouse important decision given by the delhi high court

हे देखील वाचा :

Solapur Crime | करमाळ्यात नात्याला काळिमा फासणारी घटना! चुलत भावाने केले अल्पवयीन बहिणीशी लग्न

Delhi High Alert | दिल्लीत हाय अलर्ट ! तहरिक-ए-तालिबानची बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी

Pune Crime | कोंढव्यातील अट्टल गुन्हेगार नागपुर कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध ! MPDA कायद्यान्वये CP अमिताभ गुप्तांची आजपर्यंत 62 जणांवर कारवाई

Related Posts