IMPIMP

Pune Crime Branch Police | निवृत्त पोलिस अधिकार्‍याकडे 91 लाखांच्या खंडणीची मागणी, कोंढव्यातील पापा इनामदार टोळीवर गुन्हे शाखेची कारवाई, एकाला अटक

by bali123
Pune Crime | A corporator was blackmailed and demanded an extortion of 25 lakhs; Extortion case filed against RTI activist

पुणे  : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime Branch Police | निवृत्त पोलीस अधिकाऱ्यास (retired police officer) 91 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या पुण्यातील पापा इनामदार (papa inamdar) टोळीवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Crime Branch Police) खंडणी विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. या टोळीतील एकाला अटक करत टोळीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जागेवर ताबा मारून प्रतिगुंठा 1 लाख असे 91 लाख रुपयांची खंडणी मागितली जात होती. demands Rs 91 lakh ransom to Retired police officer, Crime Branch cracks down on Papa Inamdar gang in Kondhwa, one arrested

मुसा कमरोद्दीन इनामदार (वय 40, रा. भैरवनाथ मंदिरामागे, कोंढवा) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
तर याप्रकरणी टोळीतील पापा नबी इनामदार, रुपचंद भिमाजी गजरे, रफिक इनामदार आणि अय्याज अब्दुल रेहमान शेख (सर्व. रा. कोंढवा) यांच्यावर कोंढवा पोलीस (Kondhwa Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार हे माजी पोलीस निरीक्षक आहेत.
त्यांची व त्यांच्या मित्राची कोंढवा परिसरात 91 गुंठे जागा आहे.
या जागेवर पापा इनामदार याने व त्याच्या टोळीने ताबा मारला होता.
ते ताबा सोडत नव्हते. त्यांनी ताबा सोडण्यासाठी प्रतिगुंठा 1 लाख रुपये असे एकूण 91 लाख रुपयांची खंडणी मागत होते.
याबाबत तक्रारदार यांनी खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार केली होती.
त्याची चौकशी करण्यात आली.
त्यानंतर आज या टोळीवर गुन्हा दाखल करत मुसा इनामदार याला अटक केली आहे.
तर इतर फरार झाले आहेत.

या दरम्यान या टोळीने येवलेवाडी आणि कोंढवा भागात जुने व नवीन नकाशे असा घोळ घालून कमी
किमतीत जमिनी बळकावल्याचे तक्रारी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या टोळीचा पापा इनामदार हा म्होरक्या आहे. या टोळीचा आणखी कोणी साथीदार किंवा कोणी सूत्रधार आहे,
याबाबत पोलीस तपास करत आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे (additional commissioner of police ashok morale), उपायुक्त श्रीनिवास घाडगे (deputy commissioner of police shriniwas ghadge), सहाय्यक आयुक्त लक्ष्मण बोराटे assistant commissioner of police laxman borate यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे senior police inspector balaji pandhre, उपनिरीक्षक विजय झंझाड, श्रीकांत चव्हाण, कर्मचारी विनोद साळूखे, शैलेश सुर्वे, प्रदीप शितोळे, सुरेंद्र जगदाळे, सचिन अहिवळे, प्रवीण पडवळ, आशा कोळेकर, प्रदीप गाडे, संपत अवचरे,
विजय गुरव, राहुल उत्तरकर, संग्राम शिनगारे, अमोल पिलाने, भूषण शेलार,
मोहन येलपल्ले, चेतन शिरोळकर, रुपाली कर्णवर यांच्या पथकाने केली आहे.

Web Title : Pune Crime Branch Police | demands Rs 91 lakh ransom to Retired police officer, Crime Branch cracks down on Papa Inamdar gang in Kondhwa, one arrested

Related Posts