IMPIMP

Devendra Fadnavis | ‘येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये भाजपचा मोठा विजय होणार आणि एकहाती सत्ता येणारच’

by nagesh
Devendra Fadnavis | BJP leader devendra fadanvis bjp will win in all upcoming elections says devendra fadnavis

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाइनआता पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये (Assembly Elections) भाजपला मोठं यश मिळालं आहे.
यातील गोवा (Goa) राज्याची जबाबदारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर होती. या विजयानंतर फडणवीस
पहिल्यांदा नागपूरमध्ये (Nagpur) आले होते, त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. या कार्यक्रमावेळी जनतेला संबोधित करताना फडणवीसांनी (Devendra Fadnavis) महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) दोन मंत्री जेलमध्ये आहेत आता लढाई शिगेला पोहोचली आहे. भाजपच्या (BJP) नेत्यांविरोधात खोट्या केसेस टाकल्या. पण मला सरकारला सांगायचं आहे की, तुम्ही कितीही केस करा आम्ही तुमचा भ्रष्टाचारी चेहरा जनतेसमोर आणल्याशिवाय राहणार नाही. येणाऱ्या निवडणुकीत भाजपचा मोठा विजय होणार आणि एकहाती सत्ता येणार असल्याचं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.

महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) आता परिवर्तनाची लाट येत आहे. या भ्रष्टाचारी सरकारच्या विरोधात भाजपसोबत सामान्य माणूस आहे. आम्ही या भ्रष्टाचारी सरकारचा बुरखा फाडत आहोत. सामन्यांच्या लक्षात येत आहे की हे सरकार महाविकास आघाडी नाही तर महावसुली आघाडी आहे, अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, गोव्यात मला काम करण्याची संधी मिळाली याबद्दल मी भाजपचा आभारी आहे.
हा विजय माझ्या एकट्याचा नाही तर भाजपचा आहे, असं फडणवीसांनी सांगितलं.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Devendra Fadnavis | BJP leader devendra fadanvis bjp will win in all upcoming elections says devendra fadnavis

हे देखील वाचा :

Pollen Allergy | वसंत ऋतुमध्ये काही लोकांना खुप त्रस्त करू शकते ‘पोलन अ‍ॅलर्जी’, जाणून घ्या तिची 7 लक्षणे आणि बचाव

Pune Crime | घरफोडी, मोबाईल चोरी करणाऱ्या दोन गुन्हेगारांना गुन्हे शाखेकडून अटक

Pune Corporation | पुणे मनपाचे प्रशासक विक्रम कुमार यांचा दणका ! शहरात अतिक्रमण कारवाईला सुरुवात

Related Posts