IMPIMP

Devendra Fadnavis | खातेवाटप कधी होणार ? देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य, म्हणाले..

by nagesh
Maharashtra Politics News | thackeray Group mp priyanka chaturvedi tell why she meet hm amit shahmaharashtra

वर्धा : सरकारसत्ता ऑनलाइन राज्यात शिंदे सरकार (Shinde Govt) स्थापन झाल्यानंतर तब्बल 40 दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) झाला. मात्र, अद्याप खातेवाटप झालेले नाही. त्यामुळे विरोधकांकडून याच मुद्यावरुन टीका केली जात आहे. मंत्रिमंडळ विस्तार झाला मात्र खातेवाटप झाले नसल्याने अनेक प्रश्नांवर निर्णय प्रलंबित असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर वर्धा दौऱ्यावर आलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना याबाबत विचारण्यात आले. यावेळी फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी खातेवाटप लवकरच होईल असे सांगितले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

खातेवाटपावर बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, खातेवाटप लवकरच होईल. काळजी करु नका. लवकरच तुम्हाला माहिती मिळेल. तोपर्यंत तुम्हाला बरं आहे, तुम्ही दिवसभरात अनेक वेळेला खातेवाटप करत आहात. आम्ही पेपर फोडला, तर तुम्हाला काम मिळणार नाही, असे फडणवीस म्हणाले.

कांजूरमार्गची जागा मेट्रो 6 साठी

यावेळी फडणवीस यांनी मुंबई मेट्रो कारशेडवरुन (Mumbai Metro Carshed) होणाऱ्या आरोपांवर भाष्य केलं. ते म्हणाले, कांजूरमार्गची जागा (Kanjurmarg) एका डेपोसाठी आधीपासूनच मागितली गेली आहे. मात्र त्याचा वाद असल्याने हे प्रकरण हायकोर्टात (High Court) सुरु आहे. मेट्रो कारशेडची जागा मेट्रो 3 करिता मागितलेली आहे. कांजूरमार्गची जागा मेट्रो 6 साठी मागितली असल्याचे त्यांनी सांगितले.

उद्धव ठाकरेंनी ईगो साठी आग्रह

कांजूरमार्गाची जागा मेट्रो 3 साठी योग्य नाही हे आमच्या काळातील कमिटीने आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री असताना एसीएस सैनिक यांच्या उच्चस्तरीय समितीनेही स्पष्ट अहवाल दिला होता.
कारशेड आरेमध्येच (Aarey Carshed) योग्य आहे. ते कांजूरमार्ग मध्ये नेलं.
तर प्रचंड खर्च वाढेल आणि चार वर्षांचा उशीर होईल, असेही फडणवीस म्हणाले.
तसेच मला वाटतं उद्धव ठाकरेंनी फक्त ईगोसाठी कांजुरमार्गाचा आग्रह धरला.
मेट्रो कार शेडसाठी आरेमध्ये एकही झाड कापण्याची गरज नाही.
कार शेडचे 29 टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title : – Devendra Fadnavis | BJP leader devendra fadnavis comment on portfolio distribution of shinde fadnavis government

हे देखील वाचा :

Pune Pimpri Crime | बेपत्ता झालेल्या 4 वर्षाच्या चिमुकलीचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ

Pankaja Munde | ’17 ऑगस्टपूर्वीच खातेवाटप, पंकजा मुंडेंना मोठे पद मिळेल’ – गिरीश महाजन

Pune Crime | पोस्कोच्या खटल्यातील वॉरंट बजावून अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांशी केली झटापट, गाडीसह खाली पाडून गेला पळून

Related Posts