IMPIMP

Devendra Fadnavis | परमबीर सिंह यांचं निलंबन मागे, फडणवीस म्हणाले…. (व्हिडिओ)

by nagesh
Devendra Fadnavis | BJP leader devendra fadnavis explanation after withdrawing parambir singh suspension

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाईन  Devendra Fadnavis | महाराष्ट्र सरकारच्या (Maharashtra State Government) गृह विभागाने (Maharashtra Home Dept) मुंबईचे माजी पोलिस आयुक्त (Mumbai Former CP) परमबीर सिंह (IPS Param Bir Singh) यांच्यावरील सर्व आरोप मागे घेत त्यांच्यावर डिसेंबर 2021 मध्ये केलेली निलंबनाची कारवाई देखील रद्द करण्यात आली आहे. त्यांचा निलंबनाचा कालावधी देखी ऑन ड्युटी असल्याचं मानलं जावं असं गृह विभागाच्या (Home Department) आदेशात नमुद करण्यात आले आहे. परमबीर सिंह यांचे निलंबन मागे का घेतले याचा खुलसा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे. ते नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, कॅटचा (CAT (Central Administrative Tribunal) एक निर्णय आला आहे. त्या निर्णयामध्ये कॅटने परमबीर सिंह यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. त्यांची डी देखील बेकायदेशीर ठरवली आहे. त्यांचे निलंबन देखील कॅटने रद्द केले आहे. आम्ही फक्त त्या निर्णयाची अंमलबजावणी केली आहे. त्या अंमलबजावणी अंतर्गत डी बेकायदेशीर ठरवल्याने डी बंद झालेली आहे. त्या अनुषंगाने त्यांचं निलंबन देखील मागे झालेलं आहे, असं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.

सेंट्रल अ‍ॅडनिस्ट्रेटिव्ह ट्रॅबिन्यू (कॅट) यांनी दिलेल्या निर्णयामुळे परमबीर सिंग यांच्याविरोधातील डिपार्टमेंटल
कारवाईला चुकीचं ठरवत ही कारवाई बंद करण्यात आली. कॅटने परबीर सिंह यांचं निलंबनही चुकीचं ठरवत
निलंबन मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे,
असंही फडणवीस यांनी सांगितलं.

परमबीर सिंह यांनी राष्ट्रवादीचे नेते (NCP Leader) आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख
(Anil Deshmukh) यांच्यावर 100 कोटी रूपयांच्या वसुलीचे गंभीर आरोप केले होते.
त्यानंतर त्यांच्यावर 2021 मध्ये निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Devendra Fadnavis | BJP leader devendra fadnavis explanation after withdrawing parambir singh suspension

हे देखील वाचा :

Chandrashekhar Bawankule | ‘बाळासाहेब हे लढवय्ये होते, तर उद्धव ठाकरे रडोबा आहेत’, बावनकुळेंचा ठाकरेंवर घणाघात (व्हिडिओ)

Chandrakant Patil – Pune Kharip Hangam | पुणे जिल्हा खरीप हंगामपूर्व आढावा बैठक संपन्न ! बोगस बियाणे, खते, बोगस किटकनाशक प्रकरणात गुन्हे दाखल करा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

Vision Cup Under-15 Cricket Tournament | ‘व्हिजन करंडक’ अजिंक्यपद १५ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा; जॅग्वॉर्स इलेव्हन, लायन्स् इलेव्हन, लेपर्डस् इलेव्हन संघांची विजयी सलामी

Related Posts