IMPIMP

Devendra Fadnavis | पंकजा मुंडे नाराज? देवेंद्र फडणवीस म्हणाले…. (व्हिडिओ)

by nagesh
Devendra Fadnavis | hingoli farmer dashrath mule police complaint against dy cm devendra fadnavis

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनविधानपरिषदेला (Vidhan Parishad Election) डावल्यामुळे भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (BJP Leader Pankaja Munde) नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. याबाबत आज (सोमवार) पत्रकार परिषदेमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना विचारण्यात आले. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, पंकजा मुंडे या भारतीय जनता पक्षाच्या मोठ्या नेत्या आहेत. त्यांच्याकडे मध्य प्रदेशची (Madhya Pradesh) जबाबदारी आहे. त्या सातत्याने मध्य प्रदेशला जात असतात, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, मध्य प्रदेशात आता निवडणूका आहेत. तिथला प्रभार त्या सांभाळतात. आणि आम्ही सगळेच एकमेकांच्या संपर्कात असतो. तुम्ही काळजी करु नका? भाजप पक्ष हा एक परिवार आहे आणि आम्ही सर्व परिवाराचे घटक आहोत, असेही ते म्हणाले. विधान परिषदेच्या दहा जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार (Independent Candidate) सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी अर्ज मागे घेतला आहे.

आम्ही करुन दाखवणार

आमची अपेक्षा अशी होती की सत्तारुढ पक्षाने ही निवडणूक बिनविरोध करावी. सत्ताधारी पक्षातील काही लोकांनी तसा प्रयत्नही केला. पण ही निवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही. आज आम्ही सदाभाऊ खोत यांचा अर्ज माघारी घेतला आहे. आम्ही पाच जागा लढवतोय. सत्तारुढ पक्षात (Ruling Party) खूप मोठा अनरेस्ट आहे, त्या अनरेस्टला कुठेतरी जागा हवी आहे. म्हणून आम्ही पाचवी जागा लढवतोय. त्याचे काही आराखडे तयार केले आहेत. पाचवी जागा लढवणं आणि जिंकून आणणं सोपं नाही. पण मला विश्वास आहे की आम्ही पाचवी जागा जिंकणार असे फडणवीस यांनी सांगितले.

Web Title :- Devendra Fadnavis | BJP leader devendra fadnavis reaction on pankaja munde inactive participation in election process

हे देखील वाचा :

Pune PMC News | क्षेत्रिय अधिकार्‍यांनी त्यांच्या हद्दीतील बेकायदा व्यवसायांवर लक्ष ठेवावे; अतिक्रमण विभाग प्रमुख माधव जगताप यांची सूचना

Pune Crime | पुण्यातील संतापजनक घटना ! तिनं विचारलं पोलीस भरतीबाबत ! पोलिसानं डायरेक्ट न्यूड होऊन केला व्हिडीओ कॉल

Eknath Khadse | ‘गाफील राहिल्याने राज्यसभेत पराभव, विधानपरिषदेला ताकही फुंकून पिण्याची गरज’ – एकनाथ खडसे

Related Posts