IMPIMP

Devendra Fadnavis | राज ठाकरेंच्या घरी भाजप-मनसे युतीवर चर्चा? माजी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले…

by nagesh
BJP-MNS Alliance | will there be a bjp mns alliance in maharashtra bala nandgaonkar said you will get good news soon

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन गेल्या अनेक दिवसांपासून आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भाजप आणि मनसे (BJP and MNS) यांच्यात युतीची चर्चा होत होती. तर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मागील आठवड्यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे (Raj Thackeray) यांंच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. तेथील फॅमिली फोटोही समोर आले होते. त्यामुळे आणखी युतीच्या चर्चेला उधाण आलं. राज ठाकरेंच्या भेटीवरुन देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) एका मुलाखतीत बोलताना स्पष्ट सांगितलं आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या निवासस्थानी झालेल्या भेटीवर सविस्तर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘मला मुख्यमंत्री उद्धवजींनी जेवायला बोलावलं तर मी स्वत: त्यांच्या घरी जाईल.
राज ठाकरे हे प्रभावी नेते आहेत. त्यांनी नवीन घर बांधलं. त्यानिमित्ताने मी त्यांना अभिनंदनाचा फोन केला.
त्यावेळी त्यांनी सांगितलं की, कोरोनामुळे त्यांनी काही कार्यक्रम केलेला नाहीये.
पण मित्रमंडळींना घरी जेवायला बोलावतोय. त्यामुळे तुम्ही आणि वहिणी घरी जेवायला या, असं निमंत्रण त्यांनी दिलं. म्हणून मी जेवायला गेलो.

पुढे फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, ‘आमच्या सगळ्या विषयांवर गप्पा रंगल्या. कारण राज ठाकरेंकडे माहिती खूप असते.
त्यांना सगळ्या विषयांचं ज्ञान चांगलं आहे. त्यांच्याशी गप्पा मारायला मज्जा येते. त्यामुळे मी त्यांच्याशी गप्पा मारल्या.
याचा अर्थ मी युती करण्यासाठी गेलो असा काही विषय नाही.
सध्यातरी भाजप पक्षाचं मत आहे की, आम्हाला स्वत:च्या हिंमतीवर लढायला हवं.
त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकाबाबत युतीबाबत चर्चाच झाली नाही, असं ते म्हणाले.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

Web Title : Devendra Fadnavis | bjp leader devendra fadnavis reveal what discussion between raj thackeray and him at shivtirtha

हे देखील वाचा :

Pune Corporation | पुणे, पिंपरी-चिंचवड आणि औरंगाबाद मनपाच्या प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यास राज्य निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 51 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Omicron Variant | ’ओमिक्रॉन’ किती धोकादायक? सध्याची लस प्रभावी ठरेल का? कशी आहेत लक्षणं? WHO नं याबाबत केलं सावध, जाणून घ्या

Related Posts