IMPIMP

Devendra Fadnavis | पहाटेचा शपथविधी, ‘बेईमानी’ अन् ‘पश्चाताप’ ! संपूर्ण घटनाक्रमाचा होणार उलगडा; फडणवीसांचे पुस्तक लवकरच होणार प्रसिद्ध

by nagesh
Devendra Fadnavis | which questions asked by mumbai cyber police in phone tapping case devendra fadnavis revealed in vidhan sabha

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन राज्यात महाविकास आघाडीचे सरकार (Maha Vikas Aghadi Government) स्थापन होण्यापूर्वी माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अजित पवार यांच्यासमवेत पहाटे शपथविधी घेऊन सरकार स्थापन करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. या शपथविधी सोहळा घेण्याच्या निर्णयावर पुन्हा एकदा फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले आज मला खूप त्या गोष्टीचा पश्चताप होत आहे. हे नसते केले तर बरे झाले असते. लढलो असतो. इतकच नाही तर बेईमानी कुणी, कुठे आणि कशी केली, काय काय केली. हे लवकरच कळेल. या सर्व घटनाक्रमांचा उलगडा मात्र, माझ्या पुस्तकातून केला आहे, त्याची वाट बघा असे फडणवीस यांनी सांगितले.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

नेमकं काय म्हणाले फडणवीस? –
एका युट्युब चॅनलवर बोलताना फडणवीसांनी पुन्हा एकदा पहाटेचा शपथविधी तसेच काही निर्णय घेताना झालेली गफलत तसेच झालेली बेईमानी यावर त्यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, आम्ही अजित पवार यांच्यासोबत जे सरकार तयार केलं. ते वेगळ्या भावनेतून केलं होत. यापूर्वी ही आपण हे सांगितलं होत. आमच्यासोबत विश्वासघात झाला होता. केवळ एका बाजूकडून नाही तर दोन्ही बाजूकडून. त्या विश्वास घातानंतर आम्हाला वाटले, की आमच्या पाठीत खंजीर खुपसला गेलाय. राजकारणात जिवंत राहायला पाहिजे, जशाच तसे उत्तर देण्यासाठी म्हणून ते केले.

बेईमानी कुणी, कुठे आणि कशी केली? माझ्या पुस्तकात कळेलच –
यापुर्वीही मी (Devendra Fadnavis) सांगितलं आहे की त्याचा मला पश्चाताप होत आहे. हे केले नसते तर बार झालं असत. आपण लढलो असतो. पण त्यावेळी अशी परिस्थिती होती की, आपल्याला एवढा धोका दिला? एवढी आपल्यासोबत बेइमानी झाली? चला दाखवून देऊ. त्या भावनेतून ते केले. पण आता तो विषय संपला आहे. आता बेईमानी कुणी, कुठे आणि कशी केली, काय काय केली. हे मात्र, माझ्या पुस्तकात कळेल. त्याची वाट बघा… या सर्व घटनांचा माझ्या पुस्तकात उहापोह करणार आहे. एवढेच नाही तर महाराष्ट्रात सध्या केवळ सरकार आहे, शासन नाही, असेही ते म्हणाले.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

राज्य सरकारने १० हजार कोरोना मृत्यू लपवले –
कोरोना परिस्थिती ठाकरे सरकारने चुकीच्या पद्धतीने हाताळल्या.
त्यावरून फडणवीस यांनी जोरदार टीका केली. कोरोना परिस्थिती यशस्वीपणे हाताळल्याबद्दल सरकार स्वतःची पाठ थोपटून घेते.
पण देशातील एकूण कोरोना मृत्यूची संख्या पाहिली तर ३५ टक्के मृत्यू हे एकट्या महाराष्ट्रातच झाले आहेत.
हे वास्तव आहे. हे स्वीकारायला हवं असं सांगतानाच राज्य सरकारने १० हजार कोरोना मृत्यू लपवले असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title :- Devendra Fadnavis | bjp leader devendra fadnavis says i repent early morning swearing book is coming soon

हे देखील वाचा :

Supriya Sule | डान्स व्हिडीओवर टीका करणार्‍यांना सुप्रिया सुळेंचे उत्तर; म्हणाल्या…

Benefits Of Using Ice Cubes | चेहर्‍यावर बर्फ वापरण्याचे ‘हे’ आहेत 5 जबरदस्त फायदे, माहित नाहीत तर जाणून घ्या!

Pune Crime | पुण्याच्या कौटुंबिक न्यायालयातच पतीने पत्नीचा एका बुक्कीत पाडला दात

Related Posts