IMPIMP

Devendra Fadnavis | राज ठाकरेंच्या भेटीबाबत देवेंद्र फडणवीसांचा खुलासा, म्हणाले-‘…म्हणून शिवतीर्थावर गेलो होतो’ (व्हिडिओ)

by nagesh
Devendra Fadnavis | devendra fadnavis raj thackeray meet went to shivtirth for apolitical chat devendra fadnaviss reply on meeting with raj thackeray

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सोमवारी (दि.29) रात्री उशिरा शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांची भेट घेतली. अचानक झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी रात्री दहाच्या सुमारास दाखल झाले. या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल सव्वा तास बैठक झाली. (Maharashtra Politics News) मात्र, या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा झाली याचा तपशील समोर आलेला नव्हता. मात्र, आज मुंबईत माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी भेटीबाबत खुलासा केला आहे.

राज ठाकरे यांच्यासोबतच्या भेटीवर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्पष्टीकरण दिलं.
अराजकीय गप्पा मारण्यासाठी काल शिवतीर्थवर (Shivtirtha) गेलो होतो. बऱ्याच दिवसांपासून आमचं ठरलं होतं.
की एक दिवस गप्पा मारायला बसू आणि काल तो मुहूर्त निघाला. असं ठरलं होतं की राजकीय सोडून गप्पा करायच्या.
गप्पा या अराजकीय असतात, असं फडणवीस यांनी सांगितलं.

दरम्यान, गेल्या वर्षभरात घडलेल्या राजकीय उलथापालथीदरम्यान भाजप (BJP) आणि राज ठाकरे
यांच्यातील जवळीक वाढली होती. परंतु मागील काही दिवसांपासून काही मुद्द्यांवरून राज ठाकरे यांनी भाजपवर
टीका केली होती. राज ठाकरे यांच्या टीकेला भाजपच्या नेत्यांकडून प्रत्युत्तर दिले जात आहे.
त्यामुळे दोन्ही पक्षांमधील संबंधांमध्ये पुन्हा एकदा दुरावा आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.
या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याने तर्कवितर्कांना उधाण आलं होतं.
यावर देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी स्पष्टीकरण देत चर्चांना पूर्णविराम दिला.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

Web Title : Devendra Fadnavis | devendra fadnavis raj thackeray meet went to shivtirth for apolitical chat devendra fadnaviss reply on meeting with raj thackeray

Related Posts