IMPIMP

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांचा गुजरातमध्ये विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले – ‘…म्हणून काँग्रेस नेत्यांनी PM मोदींना शिव्या देणं सुरू केलं’

by nagesh
Devendra Fadnavis | devendra fadnavis verbal attack on congress over calling pm narendra modi ravan

अहमदाबाद : वृत्तसंस्था – सध्या भाजप नेते आणि मंत्री गुजरात विधानसभेच्या प्रचारात गुंतले आहेत. त्यात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) अग्रणी आहेत. गुजरात विधानसभेच्या प्रचारात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतिसुमने उधळली आहेत. नरेंद्र मोदींनी देशाचा 700 वर्षांचा कलंक पुसला, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) या ठिकाणी म्हणाले आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गुजरातमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. आजपर्यंतचा इतिहास पाहा, काँग्रेसला जेव्हा जेव्हा त्यांचा पराभव होताना दिसला, तेव्हा तेव्हा काँग्रेसचे नेते मोदींना शिव्या देणे सुरू करतात. जसजशी निवडणूक जवळ येत आहे, तसतसा काँग्रेसला त्यांचा पराभव खूप स्पष्टपणे दिसू लागला आहे. मोदींच्या विकासाच्या मॉडेलला काहीही तोड नाही, त्यापेक्षा मोठे मॉडेल आपण दाखवू शकत नाही आणि त्याचा विचारही करू शकत नाही, असे काँग्रेस नेत्यांना लक्षात येते, तेव्हा ते मोदींना शिव्या देण्यास सुरुवात करतात, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

700 वर्षांचा कलंक मिटवून अयोध्येत भव्य राम मंदिराचे निर्माण करणारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना
ज्याप्रकारे काँग्रेस शिव्या देण्याचे धारिष्ट्य करत आहे, त्यावरून त्यांची देशात निंदा होत आहे.
गुजरातमधील जनतादेखील त्यांना माफ करणार नाही. काँग्रेसचा पराभव निश्चित झाला आहे,
त्यामुळे ते मोदींना शिव्या देत आहेत, असे यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Devendra Fadnavis | devendra fadnavis verbal attack on congress over calling pm narendra modi ravan

हे देखील वाचा :

Genelia Riteish Deshmukh | रितेश देशमुख आणि जेनेलियाला बँकांकडून 116 कोटी रूपये कर्ज देण्यात ‘गडबड’ झाल्याचा आरोप, सरकारने दिले चौकशीचे आदेश

IPL Mini-Auction | IPLच्या लिलावात लागणार 1 हजारांपेक्षा जास्त खेळाडूंवर बोली; ‘या’ दोन देशांतील खेळाडू सर्वात जास्त

Mumbai Crime | अल्पवयीन मुलीवर वर्गमित्रांकडून लैंगिक अत्याचार, मुंबईतील मराठी शाळेतील धक्कादायक प्रकार उघडकीस

Related Posts