IMPIMP

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांच्या घरासमोर बॉम्ब ठेवल्याचा फोन, फोन करणारा पोलिसांच्या ताब्यात

by nagesh
 Devendra Fadnavis | nagpur police received call that bomb placed in front of devendra fadnavis house in nagpur fake caller arrested

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाईन – राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांच्या नागपुरातील घरासमोर बॉम्ब (Bomb) ठेवल्याचा धमकीचा फोन (Threat Call) आला आहे. नागपूर पोलिसांच्या नियंत्रण कक्षात (Control Room) हा फोन आल्याची माहिती समोर (Nagpur Crime News) आली आहे. हा फोन सोमवारी (दि.27) रात्री दोनच्या सुमारास आला होता. यानंतर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तपास करुन फोन करणाऱ्याला ताब्यात घेतले आहे. तसेच फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या घराच्या सुरक्षेत वाढ केली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

नागपूर पोलिसांना (Nagpur Police) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या घरासमोर बॉम्ब ठेवल्याचा फोन आल्यानंतर तातडीने बॉम्ब शोधक पथक (Bomb Squad) रात्री फडणवीस यांच्या घरी पोहचले. पथकाने देवेंद्र फडणवीस यांच्या घराची तपासणी केली. मात्र, हा फेक कॉल असल्याचे तपासात समोर आले. दरम्यान हा खोडसाळपणा करणाऱ्याला नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. तसेच फडणवीस यांच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

पोलिसांनी केलेल्या तपासात, बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा व्यक्ती दुखावलेला होता.
केवळ दिशाभूल करण्याच्या उद्देशाने त्याने हे कृत्य केले. त्याच्या कॉलमध्ये सांगण्यात आल्याप्रमाणे कोणतीही
वस्तू किंवा तथ्य त्याठिकाणी आढळून आले नाही. धमकीचा कॉल करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेऊन
त्याच्यावर पुढील कारवाई केली जात असल्याची माहिती, नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार
(CP Amitesh Kumar) यांनी दिली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :-  Devendra Fadnavis | nagpur police received call that bomb placed in front of devendra fadnavis house in nagpur fake caller arrested

हे देखील वाचा :

Pune Crime News | सख्खा मित्रच निघाला वैरी…! घेतलेले उसने पैसे मागितल्याने मित्राला संपवलं, आरोपींना अटक

Mumbai Pune Expressway | 1 एप्रिलपासून मुंबई-पुणे प्रवास महागणार! टोलदरात 18 टक्के वाढ, जाणून घ्या नवे दर

CM Eknath Shinde | ‘उमेद’ कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीच्या मागणीवर शासन सकारात्मक निर्णय घेणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Radhakrishna Vikhe-Patil | शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध – राधाकृष्ण विखे-पाटील

Related Posts