IMPIMP

Devendra Fadnavis On Girish Bapat | जमिनीशी नाळ असलेले राजकारणातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व हरपले! खा. गिरीश बापट यांना देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

by nagesh
Devendra Fadnavis On Girish Bapat | A great personality in politics who is connected to the land is lost! eat Devendra Fadnavis' tribute to Girish Bapat

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Devendra Fadnavis On Girish Bapat | “भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाने जमिनीशी नाळ असलेले राजकारणातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले आहे. विकास हाच त्यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू होता”, अशी शोकसंवेदना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. (Devendra Fadnavis On Girish Bapat)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

आपल्या शोकसंदेशात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, पक्षनिष्ठ, पण पक्षापलिकडे जिव्हाळ्याचे संबंध जोपासणारे, सातत्याने जमिनीशी नाळ ठेवणारे, राजकारणातील एक उत्तुंग आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले आहे. देशाच्या सार्वभौम सभागृहातील त्यांचा खासदार म्हणून प्रवेश हा तळागाळातून होता. नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, आमदार, मंत्री आणि नंतर ते खासदार झाले. 2014 ते 2019 या कार्यकाळात ते संसदीय कामकाज मंत्री होते. त्यांचा हजरजबाबीपणा आणि सर्व पक्षांत समन्वय, यामुळे कोणताही प्रसंग आला तरी योग्य मार्ग काढण्याची त्यांची हातोटी होती. पुण्याच्या समग्र विकासाचे चिंतन करीत असतानाच कामगार आणि शेतकरी हे त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे विषय होते. महाराष्ट्राच्या राजकारणात वावरत असताना अमरावती जिल्ह्यात त्यांनी शेती सुद्धा केली. प्रत्येक कामात त्यांनी आपला वेगळा ठसा उमटविला. महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीच्या उभारणी करणाऱ्या नेत्यांमध्ये ते अग्रणी होते. जनतेचे त्यांना भरभरुन प्रेम मिळाले. (Devendra Fadnavis On Girish Bapat)

पुण्याच्या विकासात त्यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते.
या आजारालाही त्यांनी लढवय्यासारखी झुंज दिली. यातून ते बाहेर येतील, अशी आशा होती.
पण, आज ते आपल्याला सोडून गेले. आजारी असतानासुद्धा सातत्याने मतदारसंघावर त्यांचे लक्ष असायचे.
त्यांचे निधन ही भारतीय जनता पक्षाची अपरिमित हानी आहे. एक उत्तम संसदपटू,
उत्तम वक्ते आपल्यातून निघून गेले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
त्यांचे कुटुंबीय, आप्तस्वकीय आणि सर्व कार्यकर्त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे,
असे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंवेदनेत म्हटले आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :-  Devendra Fadnavis On Girish Bapat | A great personality in politics who is connected to the land is lost! eat Devendra Fadnavis’ tribute to Girish Bapat

हे देखील वाचा :

AFINDEX-23 | भारत- आफ्रिका यांच्यातील संयुक्त लष्करी सराव, AFINDEX-23 चा पुण्यात समारोप

Pune Crime News | पुण्यात भरदिवसा व्यापार्‍याकडील रोकड लुटणार्‍या 2 मुख्य आरोपींना गुन्हे शाखेच्या युनिट-1 कडून अटक

Dr Neelam Gorhe On Girish Bapat | गिरिष बापटांसारखा नेता, असा खासदार पुनः होणे नाही – डॉ. नीलम गोऱ्हे

Related Posts