IMPIMP

Devendra Fadnavis On Mumbai Police | शरद पवारांच्या ‘सिल्व्हर ओक’वरील हल्ल्याबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले – ‘पोलीस काय करत होते ?’

by nagesh
Silver Oak Attack Case | bjp slams shivsena dilip walse patil over attack on sharad pawar home oppose appointment of ips vishwas nangare patil

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Devendra Fadnavis On Mumbai Police | राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्व्हर ओक (Silver Oak) निवासस्थानी आंदोलन झाले. त्याला हिंसक वळण लागले.
त्यावरून राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण केले आहे (Devendra Fadnavis On Mumbai Police).
ते म्हणाले की, एवढ्या मोठ्या नेत्याच्या घरावर लोक नियोजन करून जातात.
त्यावेळी पोलीस काय करत होते. पोलिसांना (Mumbai Police) याची कल्पना नव्हती का ? जर माहिती नसेल तर हे पोलिसांचे अपयश आहे.
पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांच्या State Intelligence Department (SID) अपयशाची चौकशी व्हायला हवी.
पोलिसांच्या अगोदर माध्यमांचे प्रतिनिधी पोहोचले. पोलीस उशिरा येण्याचे कारण काय ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ”शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या आंदोलनाचे दृश्य पाहिलं असता ते भयावह होते.
त्यामुळे या प्रकारची चौकशी झाली पाहिजे.” दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (NCP MLA Amol Mitkari) यांनी या हल्ल्याचा मास्टरमाइंड नागपुरात असल्याचा आरोप केला होता त्यावर उत्तर देताना फडणवीस यांनी आपण अशा लोकांच्या प्रश्नांना उत्तरे देत नसल्याचे सांगितले.” (Devendra Fadnavis On Mumbai Police)

नेमकं काय घडलं ?
उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) संपकऱ्या एसटी कर्मचाऱ्यांबाबत निर्णय दिला. त्या निर्णयाचे स्वागत कर्मचाऱ्यांनी केले.
मात्र काही जण शुक्रवारी पेडर रोड येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या ठिकाणी गेले.
तेथे आंदोलन केले. यावेळी आक्रमक झालेल्या आंदोलकांनी घोषणाबाजी करण्याबरोबरच चप्पल आणि दगडफेकही केली.
पोलिसांनी 107 आंदोलकांवर गावदेवी पोलीस ठाण्यात (Gamdevi Police Station) गुन्हा (FIR) दाखल केला.
यामध्ये 22 महिलांचाही समावेश आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

याप्रकरणी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते (Adv Gunaratna Sadavarte) यांनाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे समजते.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी या घटनेमागे कोण आहे त्याचा तपास करून दोषींवर कारवाई केली जाईल असे सांगितले.
याशिवाय आंदोलक निवासस्थान परिसरात कसे आले ? गुप्तचर यंत्रणेला माहिती का मिळाली नाही याचाही तपास करण्यात येणार असल्याचे वळसे – पाटील यांनी स्पष्ट करत तशा सूचना आयुक्तांना दिल्याचे सांगितले.

Web Title :- Devendra Fadnavis On Mumbai Police | BJP leader devendra fadanvis questions mumbai pilice over sharad pawar silver oak protest

हे देखील वाचा :

Jalgaon Crime | थरारक ! भरधाव आयशर थेट घरात घुसला; अंघोळ करणाऱ्या युवकाचा जागीच मृत्यु

Pune Crime | पुण्यात दीड कोटींच्या फसवणूक प्रकरणी बिल्डरसह तिघांविरूध्द गुन्हा, चंदननगर पोलिस ठाण्यात FIR

Priyanka Chopra Traditional Look | प्रियंका चोप्रानं पारंपारिक ड्रेस घालून दाखवला ग्लॅमरस अंदाज, फोटोतील देसी लूक पाहून नेटकरी गेले मोहून

Related Posts