IMPIMP

Devendra Fadnavis | “ज्यांना कोकणाने भरभरून दिलं त्यांनीच अन्याय केला”; रिफायनरी होणारच, देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका

by nagesh
Devendra Fadnavis | some people want to keep konkan backward but we will go ahead with barsu refinery says devendra fadnavis

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन   सध्या कोकण महोत्सव सुरू असून, या महोत्सवाला उपस्थिती दर्शवत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
(Devendra Fadnavis) यांनी कोकणातील बारसू-सोलगाव रिफायनरी करण्याचा निश्चय पुन्हा बोलून दाखवला आहे. तसेच त्यांनी माजी मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांनाही अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी (Devendra Fadnavis) रिफायनरीचा कोकणाला होणारा
फायदा सांगितला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, ‘काही लोकांना कोकणाचा विकास नको. त्यांना कोकणाला मागास ठेवायचे आहे. जेणेकरून त्यांना भावना भडकावून राजकारण करता येईल. पण आम्हाला कोकणाचा विकास करायचा आहे. त्यामुळे आम्ही कोकणात रिफायनरी करूनच दाखवू, मागच्या काळात जेव्हा युतीचं सरकार होतं आणि मी मुख्यमंत्री होतो, तेव्हा कोकणासाठी अनेक योजना झाल्या. मात्र, गेल्या अडीच वर्षांच्या काळात महाविकास आघाडी सरकारने त्या सर्व योजना बंद केल्या. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्यांना (उद्धव ठाकरे) कोकणाने नेहमीच भरभरून दिलं ते राज्याचे नेते असताना त्यांनीच कोकणावर सर्वाधिक अन्याय केला, हे दुर्दैव म्हणावे लागेल. पण आता कोकण ज्यांची कर्मभूमी आहे, असे एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. आणि अर्थमंत्री म्हणून मीसुद्धा कोकणाच्या पाठीशी उभा आहे. त्यामुळे आता कोकणवासियांनी चिंता करण्याची गरज नाही. यापूर्वीच्या काळात बंद झालेल्या कोकणासाठीच्या योजना पुन्हा सुरू केल्या जातील. कोकणाच्या विकासासाठी काजू, सुपारी आणि नारळ उत्पादक तसेच पर्यटनाच्या विकासासाठी अधिक चांगल्या योजना सुरू केल्या जातील. हे काम आणखी पुढच्या टप्प्यात नेण्याचे काम राज्य सरकार करेल.’

रिफायनरीबद्दल होणाऱ्या अपप्रचाराला खोटे ठरवत फडणवीस म्हणाले, ‘कोकणातील बारसू-सोलगाव रिफायनरी कोणत्याही परिस्थितीत होईल,
यापूर्वीच्या काळात आम्ही कोकणात रिफायनरी आणायची ठरवली, तेव्हाच ही ग्रीन रिफायनरी असेल, असे सांगितलं होतं.
या रिफायनरीसाठीचे तंत्रज्ञान पूर्णपणे नवीन होते, त्यामध्ये कोणतेही उत्सर्जन होणार नाही.
त्यासोबत ५००० एकरात फक्त हिरवळ असावी, अशी अटही आपण टाकली होती.
या रिफायनरीमुळे कोकणातील १ लाख लोकांना थेट, तर पाच लाख लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळाला असता.
मात्र, काही लोकांनी रिफायनरीबाबत चुकीची माहिती पसरवली आहे.
रिफायनरी झाल्यानंतर कोकणात आंबा येणारच नाही, असे सांगितले गेले.
गुजरातमध्ये जामनगर येथे देशातील सर्वात महत्त्वाची रिफायनरी आहे.
मात्र, त्या परिसरातून कोकणाच्या खालोखाल सर्वात जास्त आंबा परदेशात निर्यात होतो.
पण, काही लोकांना कोकण मागास ठेवायचा आहे. त्यामुळे हे लोक रिफायनरीला विरोध करत आहेत.
परंतु, आमचे सरकार या ठिकाणी रिफायनरी उभारणारच.’

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Devendra Fadnavis | some people want to keep konkan backward but we will go ahead with barsu refinery says devendra fadnavis

हे देखील वाचा :

Kirit Somaiya | राजकीय नेत्यांची दादागिरी अन् पतपेढ्यांचा भ्रष्टाचार काढणार बाहेर – किरीट सोमय्या

Maharashtra Karnataka Seemawad | बेळगावातील दगडफेकीचे पडसाद पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकामध्ये

Pune Crime | तरुणींना म्हणाले, ‘चल बैठ घुमने जाते है’ आणि गेले पोलीस काेठडीत

Related Posts