IMPIMP

Dhananjay Munde | चर्चा तर होणारच ! राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे म्हणाले – ‘येणाऱ्या काळात राज्यात मुख्यमंत्री आपलाच असणार’

by nagesh
Dhananjay Munde | dhananjay munde criticism on state govt for loss agriculture crop

सातारा : सरकारसत्ता ऑनलाइन Dhananjay Munde | राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी साताऱ्यातील डिस्कळ (Satara, Diskal) येथील शेतकरी मेळावाच्या सभेत (Farmers Meet) बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे. ‘येणाऱ्या काळात राज्यात मुख्यमंत्री (Maharashtra CM) हा आपलाच असेल,’ असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

त्यावेळी बोलताना धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी शिवसेनेच्या आमदारांवरही (Shivsena MLA) अप्रत्यक्ष टीका केली आहे. यावेळी त्यांनी पुढच्या वेळी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्रिपदाचे खाते हे आपल्याकडेच असेल कारण पुढचा मुख्यमंत्री हा आपलाच असल्याचे, देखील त्यांनी म्हटलं आहे.

“पवार साहेबांनी माझ्यावर विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी दिली होती. 5 वर्षे विरोधी पक्षनेता होतो आणि ती जबाबदारी पार पाडली. आज शब्द देतो, सामाजिक न्याय आणि विशेष विभागाचा मंत्री म्हणून, येणाऱ्या काळात सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचे मंत्रिपद द्यायचं कुणाला? जे कुणी मुख्यमंत्री असतील, ते आपलेच असतील. ते म्हणतील हे विभाग आपल्या शिवाय दुसऱ्या कुणालाच नको.” असं धनंजय मुंडे म्हणाले.

खासदार सुप्रिया सुळे काय म्हणाल्या होत्या?

सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी काही दिवसांपूर्वी तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले.
यावेळी आगामी काळात राष्ट्रवादीचा (NCP) मुख्यमंत्री होऊ दे, असं साकडं देवीला घातलं आहे.
त्याचबरोबर, मी मुख्यमंत्री व्हावं असा विचार कधी केला नाही, याचा निर्णय राज्याची जनताच घेईल. असं त्या म्हणाल्या होत्या.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Dhananjay Munde | NCP leader and maharashtra minister dhananjay munde said next cm of maharashtra will be from ncp

हे देखील वाचा :

Sara Sachin Tendulkar | साराने पोस्ट केली हृदयस्पर्शी कहाणी ! तब्बल 10 वर्ष त्रास सहन केला.. ‘अखेर’

PM Kisan Yojana | शेतकर्‍यांसाठी खुशखबर ! घरबसल्या काढू शकता पैसे

Mouth Ulcers | तोंडातील अल्सर दूर करण्यासाठी ‘ही’ सोपी पावले उचला; जाणून घ्या

Related Posts