IMPIMP

Dhanushyaban Symbol | धनुष्यबाण चिन्ह कोणाचं? चिन्ह गोठवलं तर दोन्ही गटांचा ‘प्लॅन बी’ तयार?, दसरा मेळाव्यात दोन्ही गटाकडून पक्ष चिन्हाबाबत संकेत

by nagesh
Maharashtra Political News | all remaining 13 mlas of thackeray faction in touch with cm eknath shinde says uday samant

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena Chief Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) या दोन्ही गटाचा दसरा मेळावा (Dasara Melava 2022) काल झाला. शिवाजी पार्क (Shivaji Park) आणि बिकेसी (BKC) या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करण्यात आले. यातच आता शिवसेनेचे निवडणूक चिन्ह असलेल्या धनुष्यबाण याबाबत (Dhanushyaban Symbol) निवडणूक आयोग (Election Commission) उद्या म्हणजे 7 ऑक्टोबर रोजी निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) निवडणूक आयोगाला केस सुरु करुन धनुष्यबाण चिन्हाबाबत (Dhanushyaban Symbol) निर्णय घेण्याची परवानगी दिली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना धनुष्यबाण चिन्ह (Dhanushyaban Symbol) हवे आहे. पण धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात आलं तर दोन्ही गटानं प्लॅन बी तयार ठेवलाय का? कारण काल झालेल्या दसरा मेळाव्यात दोन्ही गटाकडून पक्षचिन्ह याबाबत संकेत देण्यात आले आहेत.

शिंदे गटाची निशाणी ‘तलवार’ (Sword) असू शकते तर ठाकरे गटाची निशाणी ‘गदा’ Gada (Mace) हे चिन्ह असू शकते. बुधवारी झालेल्या दसरा मेळाव्यात दोन्ही गटांनी जवळपास चिन्हांसाठी प्लॅन बी तयार केलाय की काय असं वाटत होतं. हिंदुत्वाचे (Hindutva) विचार पुढे घेऊन निघालेल्या दोन्ही गट एकमेकांवर हल्लाबोल करण्यासाठी सज्ज झाले आहेत आणि युद्धात लागणाऱ्या शस्त्रांचा वापर दोन्ही गट निवडणूक चिन्ह (Election Symbol) म्हणून वापरण्याची शक्यता आहे. बीकेसीमध्ये तलवारीचे पुजन करण्यात आले तर दुसरीकडे विरोधकांकडून शिवतीर्थावर शस्त्रपुजन करण्यात आले. मात्र प्रतिस्पर्ध्यावर हल्लाबोल करताना गदा या शब्दाचा वारंवार उल्लेख करण्यात आला.

बीकेसी मैदानावर झालेल्या एकनाथ शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात 51 फूट ‘तलावर’ दिसली होती. तलवारीचे भलमोठं लॉन्चिंग शिंदे गटाकडून (Shinde Group) करण्यात आले. मंचाच्या खाली 51 फुट तलवारीची प्रतिकृती साकारण्यात आली होती. त्यानंतर शिंदे गटाच्या आमदारांनी 12 फुट लांब चांदीची तलवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेट दिली. दसरा मेळाव्यात धनुष्यबाण चिन्हाचं लॉन्चिंग करता आलं असतं मात्र तसं न करता खास तलवारीवर शिवसैनिकांचं लक्ष केंद्रीत होईल यावर भर देण्यात आला होता.
तर दुसरीकडे शिवतीर्तावर झालेल्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली.
उद्धव ठाकरे वारंवार विरोधकांवर हल्लाबोल करताना ‘गदा’ या शब्दाचा उल्लेख वारंवार करत होते.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

कसं दिलं जात निवडणूक चिन्ह?

निवडणूक आयोगाकडे चिन्हांची एक यादी तयार असते. ज्यावेळी धनुष्यबाण चिन्ह गोठवलं जाईल त्यावेळी याची
माहिती दोन्ही गटांना कळवली जाईल आणि नव्या चिन्हासाठी सुनावणी घेतली जाईल.
निवडणूक आयोगाकडे असलेली चिन्ह ही दोन्ही गटांना आधी उपलब्ध असतील.
जर आयोगाकडे असलेली चिन्ह दोन्ही गटांना नको असतील तर त्यांच्याकडून आयोगाकडे विनंती केली जाईल.
त्यामध्ये दोन्ही गट आपल्याला पाहिजे असलेले चिन्ह मिळावे अशी मागणी करतील.
त्यावर निवडणूक आयोग निर्णय घेईल.

Web Title :- Dhanushyaban Symbol | thackeray vs shinde shivsena party symbol bkc shivaji park dadar mumbai

हे देखील वाचा :

Pune Crime | Cpoints अ‍ॅपची लिंक पाठवून क्रेडिट कार्ड खात्यातून काढले 2 लाख रुपये, आर्थिक फसवणूक करणाऱ्या दिल्लीतील व्यक्तीवर FIR

Women’s T20 Asia Cup 2022 | महिला आशिया चषकात भारतीय महिला वरचढ, जाणून घ्या बाकीच्या संघाची स्थिती

LIC Jeevan Umang Policy | LIC च्या या योजनेत दरमहिना 1302 रुपयांची गुंतवणूक तुम्हाला देऊ शकते 27 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम, जाणून घ्या

Related Posts