IMPIMP

Dhule Zilla Parishad Election | धुळ्यात महाविकास आघाडीला दणका ! चंद्रकांत पाटलांच्या मुलीची ‘बाजी’

by nagesh
rajya sabha election bjp mla laxman jagtap came in ambulance to vote for rajya sabha election 2022

धुळे : सरकारसत्ता ऑनलाइन Dhule Zilla Parishad Election | जिल्हा परिषदेच्या 14 व पंचायत समितीच्या 28 जागांसाठीच्या निवडणूक निवडणुकीत भाजपनं महाविकास आघाडीला चांगलाच धक्का दिला आहे. लामकाणी गटात भाजपच्या धरती देवरे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार मीना पाटील यांचा 4 हजार 296 मतांनी पराभूत करून विजयी सलामी (Dhule Zilla Parishad Election) दिली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

धरती देवरे या गुजरात भाजप प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील (Chandrakant R. Patil) यांच्या कन्या असून गतवेळी त्या बिनविरोध विजयी झाल्या होत्या. मात्र यावेळी महविकस आघाडीने (maha vikas aghadi) त्यांच्यासमोरकडवं (Dhule Zilla Parishad Election) आव्हान उभं केलं होत. मात्र, त्यांनी विजय खेचून आणला आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडीच्या मीना पाटील यांना चांगलीच धूळ चारल्याची चर्चा सुरू झाली आहे.

या पोटनिवडणुकीत शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादी (NCP), काँग्रेस (Congress) एकत्र आली असून आघाडी ने एकत्रित उमेदवार दिले आहेत. त्यामुळे भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशीच प्रमुख लढत दिसत आहे. कुसूंबा जिल्हा परिषद गटात मात्र राष्ट्रवादी सह शिवसेनेने देखील आपला उमेदवार दिला आहे.

ओबीसी उमेदवार किती उभे राहणार ?

भाजपने सर्व जागांवर ओबीसी उमेदवार दिले आहेत. तर काँग्रेस ७, शिवसेना ४, राष्ट्रवादीने ४ जागांवर ओबीसी उमेदवार दिले आहेत.

कोणत्या पक्षानं किती महिला उमेदवार
या निवडणुकीत भाजप ने ८ महिला तर महाविकास आघाडीने ९ महिला उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवल्या आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

गेल्या वेळचं चित्र काय होतं ?
गेल्या अनेक वर्षांपासून काँगेसचा बालेकिल्ला असलेल्या धुळे जिल्हा परिषदेवर पहिल्यांदाच भाजपने १५ पैकी ११ जागांवर विजय मिळवत बहुमताने सत्ता काबीज केली आहे.तर काँग्रेस आणि शिवसेनेला प्रत्येकी दोन जागा मिळाल्या आहेत.

गतवेळीही महाआघाडी एकत्रित लढली होती.
याचा सर्वाधिक फटका राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाला बसला आहे.
याही वेळी महाआघाडी एकत्रित लढत आहे त्यामुळे यावेळेस भाजपच्या जागा वाढतात की घटतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Web Title :- Dhule Zilla Parishad Election | dhule zilla parishad election result cr patil daughter election dharti deore wins meea patil lose election

हे देखील वाचा :

IPL Cricket Betting | आयपीएल मॅचवरील बेटिंगप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुलाला अटक

Kolhapur Anti Corruption | वीज जोडणीसाठी लाच मागणाऱ्या अभियंत्यासह एकजण अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Bodybuilding Competition | मानलं रे पठ्या ! सातासमुद्रापार महाराष्ट्रातील सहाय्यक पोलिस निरीक्षकाचा डंका; जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत पटकावला तिसरा क्रमांक

Related Posts