IMPIMP

Diabetes Blood Sugar | ‘या’ 4 पिठाच्या भाकरी खाल्ल्याने डायबिटीज राहील नियंत्रणात, शुगरचा वेग मंदावतो; ‘हे’ आहे कारण

by nagesh
Diabetes Blood Sugar | the-best-types-of-rotis-for-diabetes-ragi-amaranth-jau-chana-atta-help-to- reduce-blood-sugar-instantly

नवी दिल्ली : Diabetes Blood Sugar | डायबिटीज हा आजार सध्या सर्वच वयोगटात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यावर कायमस्वरूपी उपाय नाही, परंतु तो नियंत्रणात ठेवता येतो. यासाठी जीवनशैली आणि आहार यामध्ये काही बदल करणे गरजेचे असते. डायबिटीज रूग्णांनी आहाराची निवड डॉक्टरांच्या सल्ल्याने केली पाहिजे. काही घरगुती उपायसुद्धा यासाठी करू शकता. काही पिठाच्या भाकरी नियमित खाल्ल्यास डायबिटीज रूग्णांना चांगला आराम मिळू शकतो. (Diabetes Blood Sugar)

नाचणीच्या पिठाची भाकरी –

नाचणी हे फायबर युक्त धान्य आहे. नाचणीच्या पिठापासून बनवलेल्या भाकरीमुळे डायबिटीज दूर राहतो. डायबिटीज असेल तरी नाचणीच्या पिठाची भाकरी ब्लड शुगर नियंत्रित ठेवते. यातील फायबरमुळे पोट भरलेले जाणवते, त्यामुळे वजनही कमी होते. वजन नियंत्रणात राहिल्याने डायबिटीज होण्याचा धोका कमी होतो. (Diabetes Blood Sugar)

राजगिरा पीठाची भाकरी –

राजगिरा ही एक धान्य वनस्पती आहे. राजगिरा पासून लापशी बनवली जाते. अलीकडील संशोधनात अँटी डायबिटीज आणि अँटीऑक्सीडेटिव्ह गुणधर्म आढळल्यानंतर राजगिरा खूप लोकप्रिय झाला आहे. राजगिरा भाकरी ब्लड शुगर नियंत्रणात ठेवते.

बार्लीची भाकरी –

बार्लीमध्ये भरपूर फायबर असते. मेटाबॉलिज्म बुस्ट करणारे हार्मोन रिलिज करण्याचे प्रमाण बार्ली वाढवते. बार्ली लो ग्रेड इम्ल्फामेशन कमी करते, ज्यामुळे शरीराला अनेक रोगांपासून संरक्षण मिळते.

हरभरा डाळीच्या पिठाची भाकरी –

हरभरा डाळीच्या पिठाची भाकरी किंवा सत्तूची भाकरी खूप औषधी असते. यामध्ये भरपूर फायबर असते जे ब्लड शुगरचे जलद शोषण करते.
यामुळे डायबिटीज नियंत्रणात राहतो. कोलेस्ट्रॉलही कमी होते.

Web Title : Diabetes Blood Sugar | the-best-types-of-rotis-for-diabetes-ragi-amaranth-jau-chana-atta-help-to-
reduce-blood-sugar-instantly

Related Posts