IMPIMP

Diabetes Diet | या 5 डाळी मिळून बनवा डायबिटीजच्या रूग्णासाठी हेल्दी डाएट प्लान

by nagesh
Diabetes Diet | these 5 pulses help to reducing blood sugar level

सरकारसत्ता ऑनलाइन –  Diabetes Diet | डायबिटिज एक मेटाबॉलिज्म डिसऑर्डर आहे. ज्यामध्ये रुग्णाच्या रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण (Glucose level) खूप जास्त असते. जेव्हा शरीरातील स्वादुपिंड इन्सुलिन (Pancreatic Insulin) तयार करणे थांबवते किंवा कमी करते तेव्हा मधुमेह (Diabetes) होतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीचे शरीर पुरेसे इंसुलिन तयार करत नाही तेव्हा शरीरातील पेशी इन्सुलिनला योग्य प्रतिसाद देऊ शकत नाहीत. इन्सुलिन योग्य प्रमाणात तयार न झाल्यास त्याचा मेटाबॉलिज्म सिस्टमवरही परिणाम होतो. (Diabetes Diet)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

मधुमेहाच्या रुग्णांसाठी (Diabetic Patients) साखरेवर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी आहारावर नियंत्रण ठेवणे आणि शरीर सक्रिय ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. मधुमेहाच्या रुग्णांनी आहारात कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेल्या पदार्थांचे सेवन करावे, तसेच त्या पदार्थांमध्ये असलेल्या पोषक तत्वांची काळजी घ्यावी.

साखरेच्या रुग्णांसाठी आहारात कडधान्यांचे सेवन करणे अत्यंत उपयुक्त आहे. मधुमेहाच्या रुग्णांनी असा आहार घ्यावा ज्यामध्ये फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांसारख्या पोषक घटकांचे प्रमाण खूप जास्त असेल. मधुमेहाच्या रुग्णांनी कोणती कडधान्य खावीत, ज्यामुळे त्यांचा मधुमेह नियंत्रणात राहतो, तसेच शरीराला पोषक तत्वही मिळतात ते जाणून घेऊया. (Diabetes Diet)

कडधान्य रक्तातील ग्लुकोजची पातळी सामान्य श्रेणीत ठेवण्यास मदत करतात. डाळींमध्ये असलेले कार्बोहायड्रेट्स, फायबर (Carbohydrates, fiber) आणि हा प्रोटीन रक्तातील ग्लुकोजमध्ये कार्बोहायड्रेट्सचे विघटन कमी करतात, ज्यामुळे ब्लड शुगर लेव्हल (Blood Sugar Level) वाढण्यास प्रतिबंध होतो. संशोधनानुसार, कडधान्य कमी ग्लायसेमिक इंडेक्स आणि उच्च फायबर सामग्रीमुळे ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. मधुमेही रुग्णांनी आहारात डाळींचा समावेश करणे गरजेचे आहे.

1. राजमाचे सेवन करा (Rajma) :
राजमामध्ये (Rajma) कमी ग्लायसेमिक इंडेक्स असतो, जो मधुमेह नियंत्रित करण्यासाठी खूप प्रभावी आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

2. छोले करतात शुगर कंट्रोल :
प्रोटीन, फायबर, अत्यावश्यक खनिजे आणि जीवनसत्त्वे असलेल्या चण्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, जो शुगरच्या रुग्णांसाठी (Blood Sugar Level Control) उत्तम अन्न आहे.

3. चनाडाळ (Chandal) : 
कमी ग्लायसेमिक चना डाळमध्ये प्रोटीन आणि फॉलिक अ‍ॅसिड मुबलक प्रमाणात असते ज्यामुळे रक्त पेशी तयार होण्यास मदत होते.

4. उडीद डाळ (Urad Dal) :
प्रोटीनने समृद्ध असलेल्या उडदाच्या डाळीमध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स असतो, जो शुगर कंट्रोल करतो आणि त्वचेचे संरक्षण देखील करते.

5. मूग डाळ (Moong dal) :
प्रोटीनयुक्त मूग डाळीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. हे तुमच्या हृदयाच्या आणि थायरॉईड रुग्णांच्या चांगल्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे.

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Web Title :- Diabetes Diet | these 5 pulses help to reducing blood sugar level

हे देखील वाचा :’

Pune Crime | दुर्दैवी ! स्विमिंग पूल बाहेर येताच ओल्या अंगाचा लाईटच्या खांबाला स्पर्श, लोणावळ्यात 13 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

Turmeric Water | मान्सूनमध्ये हळदीच्या पाण्याने करा आपल्या दिवसाची सुरुवात, इम्युनिटी राहिल स्ट्राँग; वारंवार पडणार नाही आजारी

Pune Crime | ट्रेलर चालकाला कोयत्याचा धाक दाखवून लुबाडणार्‍या 5 जणांना अटक; सराईतांवर खडकी पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा

Related Posts