IMPIMP

Diabetes Tips | पाकातील गुलाबजाम खा किंवा जिलेबी, खाल्ल्यानंतर केवळ करा हे सोपे काम, कधीही वाढणार नाही Blood Sugar

by nagesh
Diabetes Tips | according to american nutritionist 10 minute walking after meal is best way to control blood sugar

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Diabetes Tips | मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक औषधे उपलब्ध आहेत, परंतु तज्ञ चांगला आहार आणि नियमित व्यायामाचा सल्ला देतात (Diabetes Tips). अमेरिकन पोषणतज्ञ Cory L Rodriguez यांनी सांगितले आहे. दररोज जेवल्यानंतर केवळ दहा मिनिटे चालणे शुगर रुग्णांना फायदेशीर ठरू शकते (How to reduce blood sugar level immediately).

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

मधुमेह (Diabetes) हा झपाट्याने पसरणारा जीवनशैलीचा आजार आहे ज्यावर कायमस्वरूपी इलाज नाही. हा आजार तेव्हा होतो जेव्हा तुमच्या शरीरातील स्वादुपिंड इन्सुलिन नावाचे हार्मोन तयार करणे थांबवते किंवा कमी करते.

वास्तविक हा हार्मोन ब्लड शुगर (Blood Sugar) वर नियंत्रण ठेवतो. साहजिकच, असे न झाल्यास, ब्लड शुगर लेव्हल वाढू लागते, ज्यामुळे अनेक गंभीर आरोग्य समस्यांचा धोका असतो. (Diabetes Tips)

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या अंदाजानुसार जगातील सुमारे 422 दशलक्ष लोक मधुमेहाच्या विळख्यात आहेत आणि सुमारे 1.5 दशलक्ष लोक दरवर्षी मधुमेहामुळे मरतात.

मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक औषधे असली तरी तज्ज्ञांनी चांगला आहार आणि नियमित व्यायामाचा सल्ला दिला आहे.

अमेरिकन न्यूट्रिशनिस्ट कॉरी एल रॉड्रिग्ज (Cory L Rodriguez) यांनी मधुमेह नियंत्रित करण्याचा एक सोपा मार्ग सांगितला आहे. दररोज जेवल्यानंतर केवळ दहा मिनिटे चालणे शुगर रुग्णांना फायदेशीर ठरू शकते. चालण्याने रक्तातील साखर कशी नियंत्रित राहते ते जाणून घेवूयात…

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

जेवल्यानंतर काय करावे
पोषणतज्ञांचे म्हणणे आहे की, जर तुम्ही जास्त साखरेचे जेवण खाल्ले असेल,
म्हणजेच ज्या पदार्थात साखरेचे प्रमाण जास्त असेल अशा पदार्थांचे सेवन केले असेल, तर तुम्ही जेवल्यानंतर फक्त 10 मिनिटेच फिरायला जा.

हे ब्लड शुगरचे व्यवस्थापन करण्यास आणि अन्नातून अतिरिक्त ग्लुकोज वापरण्यास मदत करू शकते.
तज्ज्ञ म्हणतात की, जेव्हा तुम्ही चालता तेव्हा ते तुमच्या स्नायूंना तुमच्या रक्तातून अतिरिक्त ग्लुकोज काढण्यास मदत करते.

चयापचय आरोग्यासाठी चांगले
जेवल्यानंतर चालणे आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी मधुमेहाचे रुग्ण असाल तर जेवल्यानंतर काही वेळ चालणे आवश्यक आहे, असे त्यांचे मत आहे.

हे केवळ चयापचय आरोग्यासाठी चांगले नाही तर ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्याचा देखील एक चांगला मार्ग आहे.

संशोधन सुद्धा करते दावा
डायबिटीज केअरमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे
की जेवणानंतर दिवसातून तीन वेळा चालणे 24 तासांत ब्लड शुगर लेव्हल कमी करण्यास मदत करते.
अभ्यासात असे आढळून आले आहे की रात्रीच्या जेवणानंतर चालणे ब्लड शुगर कमी करण्यासाठी सर्वात प्रभावी असल्याचे दिसून आले आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Web Title :- Diabetes Tips | according to american nutritionist 10 minute walking after meal is best way to control blood sugar

हे देखील वाचा :

Sanjay Raut | ‘महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यास तयार, पण…’ – संजय राऊत यांचं मोठं विधान

7th Pay Commission | 52 लाख कर्मचार्‍यांना होणार लाभ, फिटमेंट फॅक्टरबाबत खुशखबर !

Rule Change | 1 जुलैपासून बदलणार आहे SBI, RTO, TDS, Aadhar-PAN Card सह अनेक नियम, तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम

Related Posts