IMPIMP

Dilip Walse Patil | पोलिसांच्या प्रतिमेबद्दल गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना चिंता, DGP ऑफिसमध्ये घेतली आढावा बैठक

by nagesh
Maharashtra Police Recruitment | seven thousand policemen will be recruited in maharashtra police

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Dilip Walse Patil | अलीकडे घडलेल्या काही घटनांमुळे पोलिसांची प्रतिमा डागाळलेली आहे. त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण केले जात आहे. त्याअनुषंगाने राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil) यांनी मंगळवारी पोलीस महासंचालक कार्यालयात आढावा बैठक घेतली. मुंबईसह राज्यातील कायदा व सुव्यवस्था तसेच महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांचा सविस्तर आढावा घेतला. दरम्यान, पोलिसांची प्रतिमा सुधारण्यासाठी पोलिसांनाच सामूहिक प्रयत्न केला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

दिलीप वळसे-पाटील म्हणाले, पोलिसांची चांगली प्रतिमा सर्व सामान्य जनतेत निर्माण झाली पाहिजे. यंत्रणेबद्दल विश्वास निर्माण करणे आपल्या सर्वांची
जबाबदारी आहे. त्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करावेत. छोट्या तक्रारींची तत्काळ दखल घेऊन कार्यवाही केल्यास पोलिसांबद्दल लोकांमध्ये विश्वास निर्माण
होईल. त्यातून मोठ्या स्वरूपाचे गुन्हे टाळता येऊ शकतील. हे सर्व करण्यासाठी प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची भूमिका महत्त्वाची आहे.
कोणत्याही घटनेचा तपास, गुन्हा नोंद अथवा अन्य आनुषंगिक कार्यवाही व कारवाई विहित मुदतीत पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यासाठी नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

सायबर सुरक्षेसाठी नवनवीन प्रयोग, संशोधन आणि गुन्हे उकल करण्यासाठी विविध पद्धतीचा वापर करण्याच्या सूचना देत राज्यातील महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांचाही आढावाही वळसे-पाटील यांनी घेतला.
ते म्हणाले, परिचित व्यक्तींकडूनच गुन्हे घडल्याचे निदर्शनास येत आहे.
पीडित महिलेची तक्रार तत्काळ नोंदवून त्याचा जलदगतीने तपास करावा. तसेच दक्षता समित्या नव्याने कार्यान्वित करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

अवैध दारू विक्रीचे प्रमाण वाढत आहे.
त्यासाठी पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाने एकत्रित कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करावी.
अन्न व औषध प्रशासन विभागासोबत ग्रामीण भागातील वाढत्या अमली पदार्थाच्या सेवन व दळणवळणावर संयुक्तपणे कारवाई करण्याच्या सूचनाही दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी केल्या.

Web Title: Dilip Walse Patil | home minister Dilip Walse Patil concerned over police image take meeting at DGP office

हे देखील वाचा :

Gold Price Update | सोन्याच्या किमतीमधील चढ-उतारामुळे ग्राहक संभ्रमात, आता 27691 रुपयांत मिळतेय 1 तोळा, जाणून घ्या 14, 18, 22, 23 आणि 24 कॅरेटचे दर

Nitin Gadkari | नितीन गडकरी यांच्या साधेपणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल; जाणून घ्या नेमकं काय झालं?

Pune Crime | दोन मुलीचं झाल्याने विवाहितेचा छळ; सासरच्या जाचाला कंटाळून महिलेची आत्महत्या

Related Posts