IMPIMP

Dilip Walse Patil | ‘फडणवीसांनी विरोधक म्हणून भूमिका घेताना राज्याला कमीपणा येऊ नये, हे पाहावे’

by nagesh
Dilip Walse Patil | Maharashtra Home Minister dilip walse patil give important advice bjp leader devendra fadnavis

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन Dilip Walse Patil | महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना एका मुलाखतीदरम्यान सल्ला दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांना लहान वयात मुख्यमंत्री पदावर काम करण्याची संधी मिळाली. आपल्या कामावर फोकस असणारे देवेंद्र फडणवीस आहेत. पण, आता विरोधी पक्षनेते म्हणून काम करताना आणि विरोधक म्हणून भूमिका घेताना फडणवीस यांनी राज्याला कमीपणा येईल, असे काही करू नये. त्याकडे अधिक लक्ष द्यावे, हाच माझा त्यांना सल्ला आहे. असं दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे.

त्यावेळी बोलताना वळसे पाटील (Dilip Walse Patil ) म्हणाले की, फडणवीस हे फोकस असलेले व्यक्तिमत्त्व आहे. पण, विरोधी पक्षनेते म्हणून काम करताना, प्रतिक्रिया देताना राज्याला कमीपणा येऊ नये, हे पाहिल्यास त्यांनाच त्याचा जास्त फायदा होईल. असं ते म्हणाले. त्याचबरोबर पुढे ते म्हणाले, धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे चांगले राजकारणी आहेत, चांगले वक्ते आहेत, निर्णय प्रक्रिया चांगली आहे. मात्र, धनंजय मुंडे यांनी अधिकाधिक लोकांशी संपर्क वाढवणे गरजेचे आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

पुढे ते म्हणाले, अजित पवार (Ajit Pawar) यांचा महत्त्वाचा गुण म्हणजे ते कामामध्ये वाघ आहेत. हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. परंतु, राजकारणात किंवा समाजासाठी काम करत असताना कामे कधीही संपत नाहीत. त्यामुळे राजकारण आणि कामाशिवाय अजित पवार यांनी गप्पा मारल्या पाहिजे, संपर्क साधला पाहिजे, तसाच तो वाढवला पाहिजे, असा एक सल्ला पवार यांना दिला आहे. तर, अशोक चव्हाण यांना मी मुख्यमंत्री म्हणून, खासदार म्हणून पाहिले. तर नियोजनबद्ध कार्य करणारे ते नेते आहेत. पण, पक्षात आणि पक्षाबाहेर अशोक चव्हाण यांनी संपर्क आणि विस्तार वाढवला पाहिजे. असं वळसे-पाटील म्हणाले.

Web Title :- Dilip Walse Patil | Maharashtra Home Minister dilip walse patil give important advice bjp leader devendra fadnavis

हे देखील वाचा :

Captain Amarinder Singh | पंजाबच्या राजकारणात नवा वाद ! तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या पाकिस्तानी गर्लफ्रेंडची ‘खमंग’ चर्चा

Thyroid Symptoms | अचानक वजन कमी झाले किंवा वाढू लागले तर व्हा सावध; असू शकतो ‘या’ गंभीर आजाराचा धोका, जाणून घ्या

Dilip Walse Patil | ‘…म्हणून शरद पवारांनी मला साखर कारखाना दिला’

Pune News | जीवाची पर्वा न करता ‘कोरोना’ विरूध्दच्या मोहिमेत योगदान देणाऱ्यांचा धनकवडीत ‘सन्मान’

Related Posts