IMPIMP

Dilip Walse Patil | … तर कठोर पावले उचला; गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचे पोलिसांना आदेश

by nagesh
Dilip Walse Patil | maharashtra home minister dilip walse patil order to police take action who create law and order issue

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनमनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंग्याबाबत (Azaan On Loudspeakers) आक्रमक भूमिका घेतली आहे. मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी त्यांनी अल्टिमेटम दिला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री (Maharashtra Home Minister) दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी पोलीस महासंचालक रजनीश सेठ (DGP Rajneesh Seth) यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीमध्ये राज्यात कायदा आणि सुव्यवस्था (Law and Order) रहावी यासाठी प्रसंगी कठोर पावले उचला असे स्पष्ट आदेश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी पोलिसांना दिले आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. या बैठकीमध्ये विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. राज्यात शांतता कायम ठेवण्यासाठी पोलीस (Maharashtra Police) यंत्रणेने कठोर पावले उचलण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले. कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांना तात्काळ ताब्यात घेतले जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

खबरदारीचा उपाय म्हणून काही जणांना नोटीस देण्यात आल्या आहेत.
तेढ निर्माण करताना व्यक्ती, गट आढळून आल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, असेही आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
तसेच राज्यातील संवेदनशील भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

कोणालाही कायदा हातात घेता येणार नाही- DGP
गृहमंत्र्यांच्या बैठकीनंतर पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी पत्रकार परिषद घेतली.
यावेळी त्यांनी राज्यात कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्याचे आवाहन नागरिकांना केले.
ते म्हणाले, स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात बैठका घेतल्या जात आहेत. राज्यात कोणालाही कायदा हातात घेता येणार नाही.
जे कायदा बिघडवण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यवार कठोर कारवाई (Strict Action) केली जाईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

15 हजारांहून अधिक जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
पत्रकार परिषदेत बोलताना डीजीपी यांनी सांगितले की, आतापर्यंत 15 हजारांहून अधिकजणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
सीआरपीसी कलम 107, 110, 151, 151 (3) आणि महाराष्ट्र पोलीस कायदा (Maharashtra Police Act) कलम 55, 56 नुसार प्रतिबंधात्मक कारवाई (Preventive Action) करण्यात येत आहे.
तसेच 13 हजारांहून अधिकजणांना कलम 149 अंतर्गत नोटीस देण्यात आली असल्याची माहिती पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांनी दिली.

Web Title :- Dilip Walse Patil | maharashtra home minister dilip walse patil order to police take action who create law and order issue

हे देखील वाचा :

MNS on Ajit Pawar | ‘अजित पवार सुपारीबाज, तुमच्यासारखे टोप्या घालून राजकारण करत नाही’ – मनसे

MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरेंकडून 12 अटींचे उल्लंघन, FIR मध्ये राज ठाकरे मुख्य आरोपी; ‘या’ कलमान्वये गुन्हा दाखल

Ajit Pawar | अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना सूचना, म्हणाले – ‘गाफिल न राहता कामाला लागा, निवडणुका घोषित होऊ शकतात’

Related Posts