IMPIMP

Dilip Walse Patil | राज ठाकरेंच्या सभेवर गृहमंत्र्यांचे सूचक वक्तव्य, म्हणाले…

by nagesh
Dilip Walse Patil | violation of conditions by raj thackeray will there be action home minister dilip walse patils statement

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनऔरंगाबाद येथे झालेल्या सभेमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांसंदर्भात (Azaan On Loudspeakers) आक्रमक आणि स्पष्ट भूमिका घेत 4 तारखेपासून दुप्पट आवाजात हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) लावण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले होते.
दरम्यान, मनसेला सभा घेण्यासाठी पोलिसांनी (Aurangabad Police) काही अटी घालून दिल्या होत्या.
मात्र, त्या अटींच पालन झालं आहे की नाही यावर आता चर्चा सुरू झाली आहे. राज ठाकरेंवर कारवाई होणार का ? असा सवाल आता उपस्थित केला जाऊ लागला आहे. त्यावर गृहमंत्री (Maharashtra Home Minister) दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी सूचक विधान केलं आहे. ते म्हणाले की, भोंग्यांसंदर्भात निर्णय हा काही राज ठाकरेंनी घ्यायचा नाही. त्यांनी काल सभेमध्ये शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्यावर टीका आणि समाजात द्वेश कसा पसरेल आणि समाजा-समाजामध्ये भावना कशा भडकतील असा प्रयत्न केला आहे. राज ठाकरे यांचे कालचे संपूर्ण भाषण पोलीस ऐकतील. त्यामध्ये काही आक्षेपहार्य आहे की नाही ते पाहतील आणि अंतिम निर्णय घेतील असे दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी सांगितले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) म्हणाले की, राज ठाकरे यांच्या सभेचे व्हिडिओ औरंगाबाद चे आयुक्त (Aurangabad CP) पाहतील. त्यात अटीशर्तींचे कुठे उल्लंघन झाले आहे की नाही याची शहानिशा करतील. त्यानंतर कायदेशीर सल्ला (Legal Advice) घेऊन तसा अहवाल वरिष्ठांना पाठवतील. त्यानंतरच वरिष्ठ त्यावर निर्णय घेतील. दरम्यान, समाजात सलोखा राहील यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. जे कोणी द्वेष निर्माण करत आहेत त्यांना साथ देऊ नये असे आवाहनही त्यांनी केले.

राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्याचाही समाचार दिलीप वळसे पाटील यांनी घेतला.
ते म्हणाले, राज ठाकरेंच्या आरोपांमुळे शरद पवारांवर काही परिणाम होईल असे वाटत नाही.
पवारांचे राजकीय (Political) आणि सामाजिक जीवन (Social Life) महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण देशाला माहित आहे.
त्यांनी नेहमी विकासाच काम केले आहे. त्यांनी समाजाला एकत्र ठेवण्याचं काम केल आहे. त्यांच्यामुळे हजारो निर्णय झाले.
त्यामुळे राज्याला आजची समृद्धी दिसत आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे सांगण्यासाठी काही नाही ते असे आरोप करत असल्याचेही त्यांनी म्हटले.

घटनेनुसार प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य दिलेलं आहे. त्यामुळे पवारांच्या नास्तिकतेचा मुद्दा होऊ शकत नाही.
एवढ सगळ बोलण्याएवजी मुलांच्या नोकऱ्यांबाबत, शेतकऱ्यांबाबत बोलायला हवं होत. पेट्रोल डिझेल दरवाढ (Petrol Diesel Price Hike) हा विषयही आहे.
तसं पाहिल तर कालच भाषण हे शरद पवार आणि भोंगे या दोन विषयांवर आहे.
त्यांच्याकडे सांगण्यासारख काही नाही. त्यांनी कधी साधी बालवाडी चालवलेली नाही.
त्यामुळे भाषण करणं आणि समाजात तेढ निर्माण करणं एवढंच काम त्यांच्याकडे आहे.
शरद पवार कधीही नास्तिक (Atheist) आहे किंवा नाही याचे प्रदर्शन करत नाही ते मुख्यमंत्री असताना भीमाशंकरला (Bhimashankar) आले होते असेही वळसे – पाटील यांनी सांगितले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Dilip Walse Patil | violation of conditions by raj thackeray will there be action home minister dilip walse patils statement

हे देखील वाचा :

Raj Thackeray on Mahaarati | मनसेची राज्यभरातील महाआरती रद्द, राज ठाकरेंचा मोठा निर्णय; पोस्ट करत म्हणाले…

Sanjay Raut on Raj Thackeray | ‘महाराष्ट्र हे लेच्यापेच्यांचं राज्य नाही’ ! राज ठाकरेंच्या 4 तारखेच्या डेडलाईनवर संजय राऊतांचा पलटवार

Supreme Court | कोरोना लसीकरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश, ‘कोरोनाची लस घेण्यासाठी…’

Related Posts