IMPIMP

Disha Patani | अवॉर्ड नाईटमधील रिव्हिलिंग ड्रेसने दिशा पाटनीवर खिळल्या नजरा; चाहत्यांनी केल्या कमेंटस्

by nagesh
Disha Patani | disha patani graced the red carpet at the grazia millennial awards 2023

सरकारसत्ता ऑनलाईन – बॉलीवुड सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री दिशा पाटनी (Disha Patani) हिच्या अदांवर तरुणाई फिदा आहे. एम एस धोनी (M.S. Dhoni: The Untold Story) चित्रपटातून नावारुपाला आलेल्या दिशाचा मोठा चाहता वर्ग आहे, चित्रपटांबरोबरच दिशा इंटरनॅशनल ब्रॅन्डसोबत ब्रॅन्ड ॲम्बेसिडर म्हणून काम करताना दिसते. दिशा (Disha Patani) सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध असून तिच्या लुकवर चाहते फिदा असतात. तिने नुकत्याच एका ॲवॉर्ड शोला हजेरी लावली. यामध्ये तिच्या हॉट लूकने नेटकऱ्यांची नजर खिळून राहिली आहे.

अभिनेत्री दिशा पाटनी नेहमी तिची फिट अन् फाईन फिगर फ्लॉन्ट करताना दिसते. (Disha Patani Figure) तिचे हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. दिशा एका अवॉर्ड नाइटमध्ये (Disha Patani Night Award Look) सहभागी झाली होती. यावेळी तिने डार्क पिंक रंगाचा रिव्हिलिंग ड्रेस परिधान केला होता. (Disha Patani Revealing Dress) यावेळी तिने त्याच रंगांच्या हिल्स घातल्या होत्या. दिशाने हा लूक मोकळे केस सोडून केला होता. या रिविलिंग ड्रेसमध्ये दिशा अतिशय सुंदर दिसत असून तिचे या ड्रेसमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहत्यांनी तिची फिगर यावेळीही आवडली असून ती यामध्ये हॉट (Disha Patani Hot Photo) दिसत असल्याच्या कमेंट चाहते करत आहेत.

दिशा पाटनी हि तिच्या लूकसाठी खूप प्रसिद्ध आहे. तिने याआधीही अनेक बोल्ड फोटोशुट (Disha Patani Bold Photoshoot) केले असून सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. तिचे हे फोटो चाहत्यांना आवडत असून तिचा अवॉर्ड नाइटमधील लुकवर चाहते भाळले आहेत. दिशा पाटनी लवकरच ‘प्रोजेक्ट के’ (Project K) आणि ‘योद्धा’ (Yodha) या सिनेमांमध्ये झळकणार आहे.

Web Title : Disha Patani | disha patani graced the red carpet at the grazia millennial awards 2023

Related Posts