IMPIMP

Disha Salian Death Case | दिशा सालियन प्रकरण ! राणे पिता-पुत्रांना मोठा दिलासा !

by nagesh
Sanjay Raut On Disha Saliyan Case | sanjay raut on narayan rane nitesh rane over disha salian case

सरकारसत्ता ऑनलाइन – Disha Salian Death Case | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिशा सालियनच्या (Disha Salian) मृत्युबाबत बोलताना
खळबळजनक दावा केला होता. दिशा सालियनचा मृत्यु नाहीतर बलात्कार करून खुन झाल्याचं नारायण राणे म्हणाले होते. त्यानंतर दिशाची आई
म्हणजेच वासंती सालियन (Vasanti Salian) यांनी मालवण पोलीस स्थानकामध्ये (Malvan Police Station) जात नारायण राणे (Narayan Rane)
आणि त्यांचे पुत्र नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. (Disha Salian Death Case)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

नारायण राणेंविरोधात जो गुन्हा दाखल झाला आहे त्यासंदर्भातील तपास महेंद्र सुर्यवंशी करत आहेत. गुन्ह्याच्या चौकशीसाठी राणे यांना नोटीस बजावण्यात आली होती. मात्र राणेंनी नोटीसविरोधात (Notice) दिंडोशी न्यायालयामध्ये (Dindoshi Court) अटकपूर्व जामीनासाठी याचिका दाखल केली होती. यावर सुनावणीदरम्यान न्यायालयाने नारायण राणे आणि नितेश राणे यांना 10 मार्चपर्यंत अटक करता येणार नसल्याचं सांगितलं आहे. (Disha Salian Death Case)

राणेंनी दिशा सालियनच्या मृत्यु प्रकणावरून 19 फेब्रुवारीला घेतलेल्या पत्रकार परिषदेत (Press conference) अनेक दावे केले होते. त्यासोबतच त्यांचे पुत्र नितेश राणे यांनीही अशाच प्रकारची वक्तव्य केली होती. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी 5 मार्चला मालवणी पोलीस स्टेशनमध्ये दोघांची चौकशी (Inquiry) होणार आहे.

दरम्यान, दिशा सालियन प्रकरणातील सत्य समोर आलं तर शिवसेनेचा (Shivsena) बडा नेता तुरूंगात जाईल,
त्यामुळे हे प्रकरण फिरवण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जात असल्याचा गंभीर आरोपही राणेंनी केला होता.
उद्या राणेंच्या होणाऱ्या चौकशीनंतर पोलीस कोणती भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Disha Salian Death Case | disha salian death case narayan rane nitesh rane aba application accepted by dindoshi court

हे देखील वाचा :

Pune Corona Update | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 120 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Bombay High Court | भाजप आमदार गिरीश महाजन यांना 10 लाख रुपये जमा करण्याचे हायकोर्टाचे निर्देश, काय आहे प्रकरण, जाणून घ्या

Health Benefits | दूधासोबत ‘या’ वस्तूंच्या सेवनाने आरोग्याचे होऊ शकते नुकसान; जाणून घ्या कारण

Related Posts