IMPIMP

Disha Salian Death Case | राणे पिता-पुत्रांच्या अडचणी वाढणार? दिशा सालियानच्या कुटुंबीयांनी उचललं ‘हे’ पाऊल

by nagesh
Sanjay Raut On Disha Saliyan Case | sanjay raut on narayan rane nitesh rane over disha salian case

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Disha Salian Death Case | सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियान प्रकरणात (Disha Salian Death Case) भाजप नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांच्याकडून सतत आरोप करण्यात आलेत. दिशा सालियानचा बलात्कार (Rape) झाल्याचा गंभीर आरोप त्यांच्याकडून करण्यात आला होता. आता दिशा सालियानच्या कुटुंबीयांनी थेट राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांना पत्र लिहून कारवाई करण्याची मागणी केल्याने राणे पिता -पुत्रांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

दिशा सालियानवर बलात्कार करून हत्या करण्यात आली. असा गंभीर आरोप नारायण राणे यांनी केला होता. त्याचबरोबर या प्रकरणामध्ये सचिन वाझेचं (Sachin Vaze) कनेक्शन असल्याचा आरोपही नितेश राणे यांनी केला होता. त्यानंतर दिशा सालियान प्रकरण (Disha Salian Death Case) पुन्हा एकदा चर्चेत आलं होतं. यानंतर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी दिशाच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. त्यानंतर दिशाच्या कुटुंबीयांकडून महिला आयोगाकडे (Women’s Commission) राणे पिता – पुत्रांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पिता – पुत्रांविरोधात मालवणी पोलिसांत (Malvani Police) गुन्हा (FIR) दाखल झाला होता.

दरम्यान, त्यानंतर 8 तासांच्या चौकशीनंतरही पोलिसांनी सोडले नाही.
परत अमित शाहांना (Amit Shah) फोन लावला म्हणून पोलिसांनी सोडलं, असा दावा नारायण राणेंनी केला होता.
त्यांना अटक होण्याची शक्यता होती. पण, त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी (Pre – Arrest Bail) न्यायालयाचा दरवाजा ठोठावला.
त्यानंतर कोर्टाकडून पिता – पुत्रांना काही अटी आणि शर्तींवर अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला होता.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

यानंतर आता दिशाच्या कुटुंबीयांनी थेट राष्ट्रपती कोविंद यांना पत्र लिहिल्यामुळे राणेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आमच्या मुलीच्या मृत्यूबद्दल राजकारण केल्याचा आरोप दिशाच्या कुटुंबीयांनी केला आहे.
त्यामुळे नारायण राणे आणि नितेश राणे या दोघा पिता – पुत्रांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी,
अशी मागणीही दिशाच्या कुटुंबीयांकडून करण्यात आली आहे.

Web Title :- Disha Salian Death Case | disha salian family letter to president kovind against narayan rane and nitesh rane

हे देखील वाचा :

Pune Crime | थेरगाव येथील अनिकेत चौधरी टोळीतील ‘मोक्का’ गुन्ह्यातील आरोपीला जामीन मंजूर

SBI Alerts Customers | SBI ने ग्राहकांना केले अलर्ट ! पैशांसाठी QR कोड करू नका स्कॅन, अन्यथा होऊ शकता ‘कंगाल’

Chandrakant Patil | मोफत घरं देण्याच्या निर्णयावरुन चंद्रकांत पाटलांचा निशाणा; म्हणाले – ‘आमदार व्हा म्हणून नारळ दिला होता का?’

Related Posts