IMPIMP

DL Renewal | Driving Licence एक्सपायर झाले असेल तर करू नका चिंता, ‘या’ स्टेप्स फॉलो करून घरबसल्या करा आपले DL रिन्यू

by nagesh
DL Renewal | online driving licence renew easy steps

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाDL Renewal | तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सची मुदत संपली असेल, तर सावध व्हा आणि तुमच्या परवान्याचे लवकरच नूतनीकरण करा (DL Renewal). जर तुम्ही कालबाह्य ड्रायव्हिंग लायसन्सने गाडी चालवली आणि एखादा अपघात झाला तर विमा कंपनी तुम्हाला कोणत्याही प्रकारे मदत करत नाही (Driving Licence Renewal).

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

तसेच, चेकिंग दरम्यान, जर पोलिसांनी मुदत संपलेल्या डीएलसह पकडले तर ते मोठा दंड देखील आकारतात. या सर्व अडचणी टाळण्यासाठी, नेहमी आपल्यासोबत वैध डीएल ठेवा. आज आम्ही तुम्हाला काही सोप्या स्टेप्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही घरबसल्या तुमचा डिएल रिन्यू करू शकाल. (DL Renewal)

डीएलचे नूतनीकरण करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

1. कालबाह्य डीएलची छायाप्रत
2. वय 40 वर्षांपेक्षा जास्त असल्यास फॉर्म 1 ए सोबत वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करा
3. पासपोर्ट साइज फोटो x 2
4. वयाचा पुरावा आणि पत्त्याच्या पुराव्याच्या कागदपत्रांची छायाप्रत
5. अर्ज शुल्क रु. 200

घसरबसल्या असे रिन्यू करा तुमचे डीएल
1. तुमच्या ब्राउझरवर https://parivahan.gov.in/parivahan/ उघडा.
2. ’ऑनलाइन सेवा’ विभागात दिसणारा ’Driving Licence Related Services’ हा पर्याय निवडा.
3. तुमचे राज्य निवडा.
4. यानंतर Driving Licence Services पर्यायातून Apply for DL renewal पर्याय निवडा.
5. कृपया फॉर्म सबमिट करण्यापूर्वी मार्गदर्शक तत्त्वे काळजीपूर्वक वाचा.
6. अर्जदारांनी त्यांचे संपूर्ण तपशील नोंदवावेत.
7. पेमेंट प्रक्रिया पूर्ण करा.
8. Acknowledgement Page वर तुम्हाला Application ID दिसेल. यासोबतच अर्जदाराला त्याच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर संपूर्ण माहितीसह एक SMS ही पाठवला जाईल.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

या गोष्टी लक्षात ठेवा
ड्रायव्हिंग लायसन्स एक्सपायर झाल्यानंतरही वैध राहते आणि दंड शुल्कासह त्याचे नूतनीकरण केले जाऊ शकते.
जर तुमचे डीएल 5 वर्षांपेक्षा जास्त कालबाह्य झाले असेल तर तुम्हाला लायसन्ससाठी पुन्हा अर्ज करावा लागेल.

Web Title :- DL Renewal | online driving licence renew easy steps

हे देखील वाचा :

Fact Check | केंद्र सरकारने New Pension Scheme (NPS) कडे फिरवली पाठ, जुनी पेन्शन स्कीम कायम ! जाणून घ्या काय आहे सत्य

Pune Crime | विनापरवाना पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला विमानतळ पोलिसांकडून अटक

93 वर्षाची झाली Deccan Queen ! आता एलएचबी कोचसह दिसणार ‘नवी नवेली’, नवीन डेक्कन क्वीन 22 जून पासून धावणार, पाहा फोटो

Related Posts