IMPIMP

Dnyandev Wankhede | ज्ञानदेव वानखेडेंचा नवाब मलिक यांच्याविरोधात दावा; उच्च न्यायालयाने दिले महत्वाचे निर्देश

by nagesh
Nawab Malik | bombay high court seeks nawab maliks reply to contempt plea by sameer wankhedes father Dnyandev Wankhede

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Dnyandev Wankhede | एनसीबीचे (NCB) मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर वारंवार आरोप करणारे राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि मंत्री नवाब मलिकांना (Nawab Malik) आता मुंबई हाय कोर्टाकडून (Mumbai High Court) उत्तर दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. समीर वानखेडे यांचे वडिल ज्ञानदेव वानखेडे (Dnyandev Wankhede) यांनी नवाब मलिकांच्या विरोधात दावा दाखल केला होता. यावरून हाय कोर्टोने याबाबत निर्देश दिले आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

नवाब मलिकांच्या (Nawab Malik) या आरोपांमुळे मागील काही दिवसांपासून वानखेडे कुटुंब मीडियात चर्चेत आहे.
वानखेडे कुटुंबीयांनी मलिक यांचे आरोप फेटाळल्यानंतरही मलिक नवेच खुलासे समोर आणत आहेत.
या पार्श्वभुमीवर संतापलेल्या ज्ञानदेव वानखेडे (Dnyandev Wankhede) यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात हाय कोर्टात (Mumbai High Court)
सव्वा कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.
‘मलिक हे रोज नवे निराधार जाहीर आरोप करून आमची बदनामी करत आहेत. त्यामुळे आमची प्रतिमा मलिन होत आहे.
सोशल मीडियातून धमक्या मिळत आहे. आमच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्या जात आहेत.
याचा आम्हाला प्रचंड मानसिक त्रास होत आहे. असं ज्ञानदेव वानखेडे यांनी अर्जातून सांगितलं आहे.

न्यायमूर्ती माधव जामदार (Justice Madhav Jamdar) यांच्या खंडपीठापुढं आज (सोमवारी) हा अर्ज सुनावणीसाठी आला तेव्हा खंडपीठानं नवाब मलिक यांना उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर या प्रकरणावरून बुधवारी (10 नोव्हेंबर) रोजी सुनावणी घेण्यात येणार आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

दरम्यान, आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर (Aryan Khan Drugs Case) मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले.
वानखेडे हे खंडणी वसुली करतात. त्यासाठी खोटी प्रकरणं उभी करतात.
आर्यन खान, समीर खान यांच्यासह अन्य 26 प्रकरणांची यादीच मलिक यांनी जाहीर केली होती.
ही सर्व प्रकरणे बोगस असून त्यातील साक्षीदार समीर वानखेडे यांच्या जवळचे आहेत, असा दावा मलिकांनी केला होता.
वानखेडे हे फ्रॉड असल्याचं सिद्ध करण्यासाठी मलिक यांनी त्यांचा जन्मदाखला, पहिल्या निकाहाचे फोटो आणि वडिलांचं नाव आधी तपशीलही जाहीर केला होता.
तसेच, समीर वानखेडे हे मुस्लिम असून त्यांच्या वडिलांचं नाव दाऊद आहे, असंही त्यांनी जाहीर केलं होतं. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती.

Web Title : Dnyandev Wankhede | bombay high court asks ncp leader nawab malik to file reply on ncb officer sameer wankhedes father dnyandev wankhede plea

हे देखील वाचा :

Pimpri Corona | दिलासादायक ! पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 57 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | कोयत्याने वार करुन फरार झालेले 3 आरोपी गजाआड, भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 57 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Related Posts