IMPIMP

Dolly Khanna Portfolio Multibagger Stock | एक महिन्यात 60% वाढला ‘या’ कंपनीचा शेयर, डॉली खन्ना यांनी खरेदी केले आहेत 10 लाख शेयर

by nagesh
Govt Bank FD Interest Rate | story these government banks are giving interest rate of more than 7 persent on fd

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाDolly Khanna Portfolio Multibagger Stock | गेल्या एका महिन्यात बीएसई सेन्सेक्स 7 टक्क्यांहून जास्त घसरला आहे. मात्र, अशा काही कंपन्या आहेत ज्यांनी या घसरत्या बाजारपेठेतही गुंतवणूकदारांना चांगला रिटर्न दिला आहे. अशीच एक कंपनी चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन (Chennai Petroleum Corporation) आहे. कंपनीच्या शेअरनी गेल्या एका महिन्यात 60 टक्क्यांहून जास्त रिटर्न दिला आहे. विशेष म्हणजे यापूर्वी दिग्गज गुंतवणूकदार डॉली खन्ना यांनीही चेन्नई पेट्रोलियमचे 10 लाख शेअर्स खरेदी केले आहेत. (Dolly Khanna Portfolio Multibagger Stock)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

178 रुपयांवरून 280 रुपयांवर पोहोचला चेन्नई पेट्रोलियमचा शेअर

चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशनचा शेअर 11 एप्रिल 2022 रोजी तो 177.85 रुपयांच्या पातळीवर होता. 11 मे 2022 रोजी कंपनीचा शेअर्स 280 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहेत. कंपनीच्या शेअरनी गेल्या एका महिन्यात 62 टक्क्यांहून जास्त रिटर्न दिला आहे. चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या शेअरनी यावर्षी आतापर्यंत 179 टक्के रिटर्न दिला आहे. कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 94.65 रुपये आहे. त्याच वेळी, 52 आठवड्यांची उच्च पातळी 321.90 रुपये आहे.

2 वर्षात 400% पेक्षा जास्त दिला रिटर्न
चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या शेअरनी गेल्या दोन वर्षांत 400 टक्क्यांहून जास्त रिटर्न दिला आहे. 22 मे 2020 रोजी चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये 49.55 रुपयांच्या पातळीवर होते. 11 मे 2022 रोजी कंपनीचे शेअर्स 280 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहेत. जर एखाद्या व्यक्तीने 22 मे 2020 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर सध्या हे पैसे 5.65 लाख रुपये झाले असते.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

दिग्गज गुंतवणूकदार डॉली खन्ना (Dolly Khanna) यांनी चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या शेअर्सवर मोठा डाव लावला आहे.
दिग्गज गुंतवणूकदार डॉली खन्ना यांनी चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे 10 लाख शेअर्स खरेदी केले आहेत.
डॉली खन्ना यांनी चेन्नई पेट्रोलियमचे हे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केले आहेत. बल्क डील डेटानुसार, खन्ना यांनी रू. 263.15 च्या किमतीत शेअर्स खरेदी केले आहेत.

Web Title :- Dolly Khanna Portfolio Multibagger Stock | chennai petroleum corporation shares delivered 60 percent in just one month Dolly Khanna Portfolio Multibagger Stock

हे देखील वाचा :

Maharashtra Police News | पोलिस मुख्यालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या, प्रचंड खळबळ

Blood Fat Causes | मधुमेह, लठ्ठपणा असलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील चरबीची गंभीर समस्या

Best Multibagger Stock | 2000 रुपयांचे केले 1 लाख, 10 वर्षात मिळाला 5000% रिटर्न; जाणून घ्या

Related Posts