IMPIMP

Dormant Bank Accounts | बँकांच्या निष्क्रिय खात्यांमध्ये पडले आहेत 26,697 कोटी रुपये, जाणून घ्या कसा करावा क्लेम

by nagesh
Dormant Bank Accounts | finance minister nirmala sitharaman said that rs 26697 crore are lying in dormant accounts of banks know how to claim

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Dormant Bank Accounts | अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी मंगळवारी राज्यसभेत सांगितले की, बँकांच्या (सार्वजनिक आणि सहकारी दोन्ही) नऊ कोटी निष्क्रिय खात्यांमध्ये (9 crore dormant bank accounts) 26,697 कोटी रुपये पडले आहेत. मागील 10 वर्षात या खात्यांमध्ये कोणताही व्यवहार झालेला नाही. (Dormant Bank Accounts)

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

एका प्रश्नाच्या उत्तरात अर्थमंत्र्यांनी म्हटले की, रिझर्व्ह बँकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, 31 डिसेंबर 2020 पर्यंत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये अशा खात्यांची संख्या 8,13,34,849 होती आणि यामध्ये 24,356 कोटी रुपये जमा आहेत. तर शहरी सहकारी बँकांमध्ये अशा खात्यांची संख्या 77,03,819 आहे आणि यामध्ये 2,341 कोटी रुपये जमा आहे.

’बँकांमध्ये ग्राहक सेवा’वर रिझर्व्ह बँकेद्वारे (RBI) जारी सर्क्युलरमध्ये म्हटले आहे की, बँकांना त्या खात्यांचे वार्षिक पुनरावलोकन करावे लागेल, ज्यामध्ये एक वर्षापेक्षा जास्त काळापर्यंत कोणताही व्यवहार झालेला नाही. अशाप्रकारच्या खातेधारकांशी बँकेने संपर्क साधावा आणि लेखी स्वरूपात कळवावे की त्यांच्या खात्यात कोणताही व्यवहार होत नाही. (Dormant Bank Accounts)

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

बँकांना हा सुद्धा सल्ला दिला गेला आहे की, जी खाती निष्क्रीय झाली आहेत, त्या खातेधारकांना किंवा त्यांच्या नॉमिनीचा शोध घ्या आणि खाते पुन्हा सुरू करा.

दोन वर्षापर्यंत व्यवहार न झाल्यास…

दोन वर्ष व्यवहार न झालेल्या खात्यांना निष्क्रिय खाती मानले जाते. अशाप्रकारे खात्यात पैसे जमा होऊ शकतात, परंतु काढता येऊ शकत नाहीत. अशाप्रकारच्या खात्यात जमा पैशाना दावा न केलेली रक्कम (Unclaimed Fund) म्हटले जाते.

अशा कालखंडातील संपूर्ण रक्कम भारतीय रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) डिपॉझिटर एज्युकेशन अँड अव्हेयरनेस फंड (DEAF) मध्ये जमा होतात. याचा वापर ग्राहकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी केला जातो. जर एखाद्या ग्राहकाने डीईएएफमध्ये गेलेली रक्कम परत मागितली तर बँकेला ती व्याजसह परत करावी लागते.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

क्लेम फार्म भरून परत मिळवू शकता पैसे

RBI नुसार प्रत्येक बँकेला आपल्या वेबसाइटवर अनक्लेम्ड रक्कमेची माहिती द्यावी लागते.
जर यामध्ये एखाद्या ग्राहकाची रक्कम असेल तर त्याला आपल्या बँकेच्या वेबसाइटवर जाऊन ही माहिती घ्यावी लागते.

तो निष्क्रिय खात्याची माहिती घेण्यासाठी नाव आणि जन्मतारीख, पॅन नंबर,
पासपोर्ट नंबर अथवा टेलीफोन नंबरद्वारे ही माहित मिळवू शकतो.
यानंतर तो बँकेच्या शाखेत जाऊन क्लेम फार्म भरतो आणि केवायसीसह संबंधित कागदपत्रे जमा करतो.

दावेदार खरा असेल तर बँक पैसे परत करते.
खातेधारकाचा मृत्यु आणि त्याचे वारसदार यांच्याकडून दावा करण्याच्या
बाबतीत त्यांना खातेधारकाचा मृत्यू दाखला आणि इतर कागदपत्र जमा करावे लागतात.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

प्रलंबित रक्कमेच्या पेमेंटसह खाते पुन्हा सुरू होते.
बँक खाते निष्क्रिय असूनही जमा रक्कमेवर व्याज खात्यात जमा करत असते.

Web Title : Dormant Bank Accounts | finance minister nirmala sitharaman said that rs 26697 crore are lying in dormant accounts of banks know how to claim

हे देखील वाचा :

Sachin Vaze | चांदीवाल आयोगासमोर सचिन वाझेचा अजब दावा, म्हणाला – ‘मी अनिल देशमुखांना…’

Maharashtra Rains | राज्यात पुढील 3 दिवसांत ‘या’ 8 जिल्ह्यांत जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस, IDM चा अंदाज

ST Workers Strike | एसटी संप चिघळण्याची शक्यता, पुणे, जळगावमध्ये घडला धक्कादायक प्रकार

Related Posts