IMPIMP

Dr. Amol Kolhe | संसदेत डॉ. अमोल कोल्हेंचा माईक बंद

by nagesh
Dr. Amol Kolhe | ncp mp amol kolhe was not allowed to speak on chhatrapati shivarai during parliament winter session 2022

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – संसदेत हिवाळी अधिवेशन सुरू आहे. यावेळी विविध मुद्यांवरून विरोधक सत्ताधारी भाजपला घेरत आहेत. बुधवारी पहिल्या दिवशी लोकसभा खासदार सुप्रिया सुळे यांनी गाजवली. त्यांनी कर्नाटकचा महाराष्ट्रावर सुरू असलेला अन्याय यावर लोकसभेत प्रश्न विचारले आणि गृहमंत्र्यांना दखल देण्याची विनंती केली. गुरुवारी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) यांनी शिवाजी महाराजांचा मुद्दा उचलून धरला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल भाजप नेत्यांकडून सातत्याने वादग्रस्त वक्तव्ये होत असताना, यासंदर्भात संसदेने खास कायदा करावा, अशी मागणी खासदार अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) यांनी केली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

त्यांच्या या मागणीला विरोधी पक्षांनी दुजोरा दिला. पण त्यांनी थोडा वेळ आपले मत मांडले असेल, तोपर्यंत पीठासीन अधिकारी राजेंद्र अग्रवाल यांनी त्यांचा आवाज दाबण्यासाठी त्यांचा माईक बंद पाडला. छत्रपती शिवराय देव नाहीत. पण, देवापेक्षा आम्हाला कमी पण नाहीत. त्यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्ये करण्याची कुणाची हिम्मत होता कामा नये, त्यासाठी कायदा झाला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज फक्त महाराष्ट्राचेच नाहीतर संपूर्ण हिंदुस्थानाचे दैवत आहेत. अनेक सरसेनापतींनी, राजा-महाराजांनी छत्रपती शिवरायांकडून प्रेरणा घेतली.
असे असतानादेखील महाराष्ट्रात सातत्याने छत्रपती शिवरायांबद्दल अवमानकारक वक्तव्ये केली जात आहेत, असे अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) म्हणाले.

कोल्हे पत्रकारांना प्रतिक्रिया देताना म्हणाले, मी जो विषय मांडणार होतो, त्या विषयाला शून्य प्रहरामध्ये वेळ
देण्यात आला होता. पण, वेळ देऊनही मला बोलू दिले नाही. माझा आवाज दाबला गेला.
माझे बोलणे सुरू झाल्यावर अवघ्या दोन ते तीन वाक्यांनंतर मला खाली बसण्याची सूचना केली.
माझा माईक बंद केला गेला. माझा आवाज दाबला असेल, पण शिवभक्तांच्या आवाजाने तुमच्या कानठळ्या बसल्याशिवाय राहणार नाहीत.

Web Title :- Dr. Amol Kolhe | ncp mp amol kolhe was not allowed to speak on chhatrapati shivarai during parliament winter session 2022

हे देखील वाचा :

Pune Crime | भांडण सोडवल्याच्या रागातून तरुणावर कोयत्याने वार; वडगाव शेरीमधील घटना

SC On Property Dispute | सर्वोच्च न्यायालयाचा ज्येष्ठ नागरिकांना सल्ला; म्हातारपणाची काळजी घेतील, असे लिहून घ्या

New WhatsApp Feature-Meta | मेटाची नवी घोषणा व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्यांना मिळणार हे नवीन फीचर

Nashik Crime | नाशिक-सिन्नर मार्गावर भीषण अपघात; दुचाकीस्वारांना चिरडत एसटीने घेतला पेट, 5 जणांचा मृत्यू

Related Posts