IMPIMP

Dr Raman Gangakhedkar | शाश्वत धोरणांचा अवलंब करीत सीएसआर अंतर्गत सामाजिक प्रश्न सोडवता येणे शक्य – पद्मश्री डॉ रमण गंगाखेडकर

by nagesh
Dr Raman Gangakhedkar | It is possible to solve social problems under CSR by adopting sustainable policies - Padmashri Dr. Raman Gangakhedkar

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Dr Raman Gangakhedkar | सामाजिक आरोग्याच्या समस्या सोडविताना तळागाळातील नागरिकांना समान वागणूक देत त्यांना आवश्यक ती मदत करणे आज महत्त्वाचे आहे. हे करीत असताना व्यावसायिक सामाजिक उत्तरदायित्व अर्थात सीएसआरच्या माध्यमातून शाश्वत धोरणांची कास धरत काम करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (Indian Council of Medical Research) साथ व संसर्गजन्य रोग विभागाचे माजी प्रमुख पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर (Dr Raman Gangakhedkar) यांनी केले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

सोशिओ कॉर्प इंडिया संस्थेच्या वतीने आयोजित भारतातील सर्वांत मोठ्या दुसऱ्या सीएसआर चित्रपट महोत्सवाच्या समारोप व पुरस्कार वितरण समारंभाप्रसंगी डॉ. रमण गंगाखेडकर बोलत होते. सोशिओ कॉर्प इंडिया देशभरातील अनेक सामाजिक संस्था, कॉर्पोरेट्स यांनी आपल्या सामाजिक जाणीवेतून मांडलेल्या विषयांचा समावेश असलेले चित्रपट दुसऱ्या सीएसआर चित्रपट महोत्सवात दाखविण्यात आले. महोत्सवासाठी सामाजिक, आरोग्य, पर्यावरण, शैक्षणिक विषयांवरील तब्बल ५२ चित्रपटांनी सहभाग नोंदविला होता. यापैकी १९ चित्रपटांची निवड करीत विविध विभागात त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) सल्लागार डॉ. लीना बोरुडे, कार्नेलियन कॅपिटलचे संस्थापक विकास खेमाणी, केव्हीआयएक्सचे संस्थापक संचालक प्रदीप नागोरी आणि वरिष्ठ सीएसआर सल्लागार सुखदा खिस्ती यांनी परीक्षणाचे काम पाहिले. (Dr Raman Gangakhedkar)

बेस्ट सीएसआर फिल्म ऑन कम्युनिटी डेव्हलपमेंट – शिवा १९९६ (दिग्दर्शक – रुची शर्मा)
बेस्ट कोविड १९ ह्युमॅनिटेरियन सीएसआर फिल्म – व्हॅक्सिनेटिंग दी व्हिलेजेस – दी स्टोरी ऑफ एएनएम वर्कर्स (दिग्दर्शक – शुभ्रस्मिता संदिल्या)
बेस्ट फिल्म ऑन चाईल्ड लेबर अवेअरनेस – निशाण (दिग्दर्शक – अरविंद भोसले)
बेस्ट मेंटल हेल्थ सोशल अवेअरनेस फिल्म – दी डार्क साईड ऑफ मून (दिग्दर्शक – डॉ. सागरिका गोल्डेर)
बेस्ट फिल्म ऑन एम्पॉवरिंग वूमेन – हॉरिझॉन, व्हेन ड्रीम टचेस स्काय (दिग्दर्शक – अप्सील अजोश)
बेस्ट वेस्ट मॅनेजमेंट सीएसआर फिल्म – सस्टेनेबल व्हिलेज वेस्ट मॅनेजमेंट (दिग्दर्शक – सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज लि.)
बेस्ट सीएसआर डॉक्युमेंटरी फिल्म ऑन रुरल इकोनॉमिक ट्रान्सफॉर्मेशन – ट्रान्सफॉमिंग इंडिया (दिग्दर्शक – ग्लोबल विकास ट्रस्ट)
बेस्ट हेल्थ डॉक्युमेंटरी फिल्म– दी सेव्हीयर ऑफ मासेस (दिग्दर्शक – श्यामा गर्ग)
बेस्ट सीएसआर अॅक्टीव्हिटीज अँड कम्युनिटी डेव्हलपमेंट फिल्म – मूव्हिंग अहेड टूगेदर (दिग्दर्शक – सीएसआर टीम एचडीबी फायनान्शीयल सर्व्हिसेस अँड काऊच पोटॅटो मिडीया)
बेस्ट सोशल अवेअरनेस फिल्म ऑन चिल्ड्रन – माय हँड लाईक अ बर्ड (दिग्दर्शक – बेटिना द्रूमाँड व हॉर्टेन्स ब्रासार्ट)
बेस्ट हेल्थ केअर एक्सलन्स सीएसआर फिल्म – सारिका, (दिग्दर्शक – सीएसआर अँड सीसी डिपार्टमेंट , बाल्को)
बेस्ट सीएसआर फिल्म ऑन वुमेन्स डिजिटल ट्रान्सफॉरमेशन अँड सोशल इम्पॅक्ट – वूमेन ट्रान्सफॉरमिंग लाइव्हज विथ टेक्नोलॉजी (दिग्दर्शक – श्रीमान बिस्वजीत – बीओआय)
बेस्ट डिजिटल फायनान्शीयल लिटरसी सीएसआर फिल्म – डिजिटल सखी (दिग्दर्शक – सीएसआर टीम, एल अँड टी फायनान्स होल्डिंग्ज)
बेस्ट पॅट्रीओटिक साँग – लेहेरायेगा तिरंगा (दिग्दर्शक – अरविंद भोसले)
बेस्ट सीएसआर फिल्म ऑन कॉम्प्रीहेंसिव्ह डेव्हलपमेंट ऑन डिसॅबल्ड – प्रोजेक्ट बिंदू (दिग्दर्शक – मंजिरी गोखले – जोशी)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

सामाजिक क्षेत्रात काम करीत असताना आपल्या आजूबाजूच्या संस्था काय करीत आहेत, कोणते प्रश्न कशा पद्धतीने हाताळत आहेत हे एकत्रितपणे समजावून घ्यावे यासाठी एका व्यासपीठाची गरज होती.
हीच गरज लक्षात घेत आम्ही हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.
केवळ सामाजिक प्रश्न न मांडता ते कलात्मकपणे नागरिकांसमोर यावेत हा
सीएसआर चित्रपट महोत्सवाचा उद्देश असल्याची माहिती चेतन गांधी यांनी दिली.

यावेळी अनेक विभागात विजेत्या ठरलेल्या चित्रपटांची नावे पुढीलप्रमाणे-

बेस्ट सोशल अवेअरनेस फिल्म – काश (दिग्दर्शक- जुनैद इमाम)
बेस्ट स्कील डेव्हलपमेंट सीएसआर फिल्म – लक्ष (दिग्दर्शक – ऋषिकेश शेडगे)
बेस्ट सीएसआर फिल्म ऑन रुरल अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट – कॉल ऑफ दी हिल्स
(दिग्दर्शक – कनू भारती)
ज्युरी मेन्शन बेस्ट हेल्थ केअर एक्सलन्स सीएसआर फिल्म – विनिंग अगेन्स्ट मालन्यूट्रीशन
(दिग्दर्शक – शांती मेनन व परेश वोरा)

मुंबईतील कामाठीपुऱ्यातील भयावह परिस्थिती पाहून मी एडस् या रोगावर काम करायला सुरुवात केली, असे सांगत डॉ. गंगाखेडकर म्हणाले, “रुग्णाला जर पूर्णपणे बरे करायचे असेल तर त्याला तात्पुरती मदत करणे आवश्यक आहेच, मात्र भविष्यात त्याने स्वत:च्या पायावर उभे रहावे यासाठी तुम्हाला काहीतरी करणे गरजेचे आहे.
हीच मदत सीएसआरच्या माध्यमातून आज आपल्याला मिळू शकते हे लक्षात घ्यायला हवे.
आपापल्या परीने तुम्ही करत असलेले कार्य हे मोठे आहेच पण शाश्वत धोरणांचा
अवलंब हा सामाजिक आरोग्य क्षेत्रात वेगळा ठसा उमटवू शकतो.”चे संस्थापक
अध्यक्ष अ‍ॅड. चेतन गांधी, संचालिका सरस्वती मेहता, बाळासाहेब झरेकर, सतीश कोंढाळकर,
विजय कुलकर्णी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :-  Dr Raman Gangakhedkar | It is possible to solve social problems under CSR by adopting sustainable policies – Padmashri Dr. Raman Gangakhedkar

हे देखील वाचा :

Devendra Fadnavis | ‘हे कोण आलेत, हे काय भगतसिंगांपेक्षा मोठे आहेत का?’, राहुल गांधींच्या वक्तव्यावरुन फडणवीस सभागृहात आक्रमक (व्हिडिओ)

Crime News | छापेमारीत चिरडले गेल्याने चार दिवसांच्या अर्भकाचा मृत्यू; 6 पोलिसांवर गुन्हा दाखल; 5 पोलीस निलंबित

Coronavirus Cases In India | सावधान ! देशात कोरोनाचे रूग्ण वाढतायेत; 24 तासात 1300 नव्या रूग्णांची नोंद, तिघांचा मृत्यू

Related Posts