IMPIMP

Drinking Cold Water Is Good Or Bad | थंड पाणी प्यायल्याने तुमच्या आरोग्याला हानी पोहोचते का? जाणून घ्या

by nagesh
Drinking Cold Water Is Good Or Bad | drinking cold water is good or bad know what study says on it

सरकारसत्ता ऑनलाइन – Drinking Cold Water Is Good Or Bad | उन्हाळ्यात शरीराला हायड्रेटेड (Hydrated) ठेवणे अत्यंत आवश्यक मानले जाते आणि हायड्रेशनसाठी खुप पाणी पिणे महत्वाचे आहे. नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेसच्या मते, १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनी दररोज ३.७ लिटर पाणी प्यावे. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे तुम्हाला आरोग्याच्या अनेक समस्या (Many Health Problems Due To Lack Water) उद्भवू शकतात. कडक उन्हात थंड पाणी मिळाले तर काय बोलावे? पण तुम्हाला माहीत आहे का की थंड पाणी पिण्याची सवय तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकते? उन्हाळ्याच्या दिवसात फ्रिजमधून थंड पाणी प्यायल्याने तुम्हाला छान वाटत असेल, पण ही सवय पुढे आरोग्याच्या दृष्टीने नुकसानदायक ठरू शकते (Drinking Cold Water Is Good Or Bad).

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

जे लोक सामान्य पाणी पिण्याऐवजी थंड पाणी पितात त्यांना पोटाशी संबंधित विविध प्रकारच्या समस्यांचा धोका जास्त असतो. आरोग्याच्या दृष्टीने ही सवय हानिकारक मानली जाते. पोटाच्या समस्येबरोबरच थंड पाणी (Cold Water) पिण्याची सवयही दीर्घकाळापर्यंत राहिल्यास ती शरीराला हानी पोहोचवू शकते. त्यामुळे पुढच्या वेळी तुम्ही फ्रीजमधून थंडगार पाण्याची बाटली काढून टाकाल तेव्हा तुम्हाला त्यामुळे झालेलं नुकसान लक्षात ठेवावं लागेल (Drinking Cold Water Is Good Or Bad).

थंड पाण्यामुळे नुकसान (Damage Caused By Cold Water) :
प्यायला नेहमी सामान्य किंवा सौम्य कोमट पाणी दिले पाहिजे. थंड पाणी पिण्यावर केलेल्या अभ्यासानुसार आरोग्यावर अनेक प्रकारचे नकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. काही अभ्यासांमध्ये असे पुरावे सापडले आहेत की, थंड पाणी पिण्यामुळे आपले पोट संकुचित होते, ज्यामुळे अन्न पचविणे कठीण होते. जे लोक बर्‍याचदा थंड पाणी पितात त्यांना पाचक-संबंधित समस्यांचा धोका जास्त असतो.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पोटाचा त्रास (Stomach Problem) :
थंड पाण्यामुळे सर्दी-फ्लूची समस्या बळावू शकते, त्यामुळे पोटाबरोबरच शरीराच्या इतर अवयवांचेही नुकसान होते. १९७८ मध्ये केलेल्या एका संशोधनात, शास्त्रज्ञांना असे आढळले की, थंड पाणी पिण्यामुळे नाकात घाण गोळा होते. ज्यामुळे श्वसनमार्गात अडथळा निर्माण होतो. त्याचबरोबर सर्दी किंवा फ्लूचा त्रास असेल तर खासकरून थंड पाणी पिऊ नका. यामुळे सर्दीशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

मायग्रेनची समस्या (Migraine Problem) :
आणखी एका अभ्यासात, शास्त्रज्ञांना असे आढळले की थंड पाणी पिण्यामुळे डोकेदुखी देखील होऊ शकते. २००१ मध्ये झालेल्या संशोधनात असे आढळले आहे की थंड पाणी पिण्यामुळे मायग्रेनची समस्या वाढू शकते. जर आपण आधीपासूनच मायग्रेनचे रुग्ण असाल तर थंड पाणी पिण्यामुळे आपल्या समस्येत वाढ होऊ शकते.

२०१२ च्या अभ्यासानुसार, एक्लेसियाशी संबंधित वेदनांच्या समस्येसाठी देखील हे खूप आव्हानात्मक मानले जाते. ह्या अवस्थेमध्ये अन्ननलिकेतून अन्न जाणे कठिण होते.

थंड पाण्याचे विपरित परिणाम (Adverse Effects Of Cold Water) :
थंड पाणी पिणे केवळ हानिकारक आहे, हे सांगणे योग्य नाही, काही परिस्थितींमध्ये त्याचे फायदे देखील आहेत
असे संशोधकांचे म्हणणे आहे. २०१२ च्या एका अभ्यासात, शास्त्रज्ञांना असे आढळले आहे
की व्यायामादरम्यान थंड पाणी पिण्यामुळे शरीराचे वाढलेले तापमान स्थिर होते.
थंड पाणी पिण्याचे फायदे असले तरी त्याचे तोए अधिक आहेत. तेव्हा थंड पाणी पिणे टाळणेच योग्य राहील.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पाणी कसे प्यावे (How To Drink Water) ? :
उन्हाळा असला तरी नेहमी सामान्य पाणी पिण्याची सवय लावा, असं संशोधकांचं म्हणणं आहे.
त्याचबरोबर हलके कोमट पाणी अभ्यासात अधिक फायदेशीर ठरत असल्याचे सांगण्यात आले आहे.
शरीरातील पचन, रक्ताभिसरण आणि विषाक्तता दूर करण्यासाठी कोमट पाणी पिणे नेहमीच फायद्याचे आहे.
कोमट पाणी प्यायल्याने तुम्हाला कमी तहान लागते. उन्हाळ्यात सामान्य पाणी पिण्याची सवय लावा.

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Web Title :- Drinking Cold Water Is Good Or Bad | drinking cold water is good or bad know what study says on it

हे देखील वाचा :

Vitamin Rich Foods | केस, नखे आणि त्वचेसाठी अप्रतिम आहेत ‘या’ 8 गोष्टी; आहारात करा समाविष्ट, जाणून घ्या

DA Hike | केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात पुन्हा होणार वाढ, जाणून घ्या केव्हा आणि किती रुपये वाढणार?

Cardiac Rehabilitation | Heart Patients ना वाचवण्यासाठी कार्डियाक रिहॅब (Cardiac rehab) उपयुक्त, लोकांना याबाबत नाही माहित; जाणून घ्या

Related Posts