IMPIMP

Driving Licence New Rules 2021 | दिलासादायक ! ‘DL’साठी आता RTO कडे जायची गरज नाही; ‘या’ संस्था देखील देणार परवाना

by nagesh
New Driving Licence Rules | central ministry changed rule to get driving licence easily see full detail

वृत्तसंस्था – Driving Licence New Rules 2021 | ड्रायव्हिंग लायसन बनविण्यासाठी आरटीओ कार्यालयात खेटे मारावे लागत होते. त्यातच एजंटगिरीने तर चक्रावून सोडले होते. पैशाचीही मागणी होत होती. तसेच आरटीओच्या ट्रॅकवर चाचणी द्यावी लागत होती. त्यासाठी नंबर येण्यासाठीही या एजंटांची खाबुगिरी चालायची. यामुळे नागरिकांना सर्व कागदपत्रे असून देखील मनस्ताप सहन करावा लागत होता. मात्र ही सर्व दगदग आता कमी होणार आहे. कारण महिनाभरापूर्वी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राजमार्ग मंत्रालयाने एक नोटीस काढली आहे. त्यानुसार काही संस्थादेखील तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स काढून देऊ शकणार आहेत. आरटीओ मध्ये देखील लायसन मिळेल परंतू तेथील व्याप कमी करण्यात येणार (Driving Licence New Rules 2021) आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

या नवीन नियमानुसार वैध संस्था, कंपन्या, एनजीओ, ऑटोमोबाईल असोसिएशन, वाहन निर्माता संघ, वाहन निर्माता चालक प्रशिक्षण केंद्र (डीटीसी) यांना लायसन देण्याची मान्यता देणात येणार आहे.
त्यासाठी संस्थांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या संस्थांसाठी काही निर्देशही देण्यात आले आहे.
त्यामध्ये केंद्रीय मोटर वाहन नियम १९८९ नुसार अर्ज करणाऱ्या संस्थांकडे आवश्यक जमीन आणि आवश्यक सुविधा असणे गरजेचे आहे. तसेच त्यांच्या स्थापने नंबर स्वच्छ रेकॉर्ड असायला हवे.
या जमीनीवर ट्रॅक बांधावा लागणार आहे. (Driving Licence New Rules 2021)

वाढत्या अपघातांमुळे केंद्र सरकारने २०१९ मध्ये लोकांनी वाहतूक नियम काटेकोरपणे पाळावेत यासाठी नवीन कायदे केले आहेत.

त्यामध्ये जबर शिक्षा आणि १० ते १०० पटींनी दंडही वाढवला आहे.
दरम्यान या नवीन कायद्याची अंमलबजावणी उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, दिल्ली आदी राज्यांत लागू करण्यात आले आहेत.
महाराष्ट्रात अद्याप हे नियम लागू करण्यात आलेले नाहीत.

कोरोना काळानंतर देशातील सरकारी यंत्रणांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत.
सर्व आरटीओ कार्यालयातील कार्यपद्धतीतही बदल केले असून लर्निंग लायसन्ससाठी फी जमा करण्याच्या प्रक्रियाही बदलली आहे.
नवीन प्रणालीनुसार स्लॉट बुक होतात आणि लर्निंग लायसनसाठी पैसे जमा करावे लागत आहेत.
परीक्षेसाठी तारीख देखील पैसे जमा केल्यानंतर तुम्ही तुमच्या सुविधेनुसार निवडू शकता.

Web Title : Driving Licence New Rules 2021 | driving license new rules 2021 no need go rto now organization will also issue driving license

हे देखील वाचा :

Pravin Darekar | ‘माझ्याकडे बोट दाखवून संधी दिलीय, आता पुण्यासह इतर जिल्हा बँकेचे घोटाळे काढणार’ – प्रवीण दरेकर (व्हिडीओ)

Crime News | संतापजनक ! नशेचे औषध देऊन डॉक्टरकडून महिला कॉन्स्टेबलवर बलात्कार

Money Laundering Case | मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात राज्य गृह विभागाचे उपसचिव कैलास गायकवाड यांना ईडीचं समन्स

Related Posts