IMPIMP

Dy CM Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांनी स्वीकारला उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार; पहिल्याच दिवशी अ‍ॅक्शन मोडमध्ये

by nagesh
Devendra Fadnavis | deputy cm devendra fadnavis announced to investigate case of bogus recruitment in the ministry

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन Dy CM Devendra Fadnavis | काल झालेल्या शपथविधीनंतर आज (शुक्रवारी) देवेंद्र फडणवीस (Dy CM Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. त्याचबरोबर पहिल्याच दिवशी फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणासंदर्भात (OBC Reservation) महत्वाची बैठक घेतली. विरोधीपक्षात असताना फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणावरुन आक्रमक भूमिका घेतील होती. आता सत्तेत आल्याने फडणवीस तातडीने अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

कार्यभार स्विकारल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेल्या या बैठकीला राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव (Chief Secretary Manukumar Srivastava) त्याचबरोबर काही भाजपचे नेते मंडळी उपस्थित होती. त्यामुळे फडणवीस पुन्हा एकदा जोमाने कामाला लागले आहेत. पहिल्याच दिवशीच्या बैठकीतून फडणवीस यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना एक प्रकारे मेसेज देण्याचं काम केलं.

दरम्यान, मागील महाविकास आघाडी सरकारमध्ये (Mahavikas Aghadi) ओबीसी आरक्षणामुळे मोठा राजकीय आणि सामाजिक पेच निर्माण झाला होता.
सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) महाराष्ट्रातील ओबीसीच्या राजकीय आरक्षणाला मान्यता न दिल्याने राज्यातील ओबीस समाज नाराज आहेत.
हे आरक्षण टिकवण्यासाठी आघाडी सरकारने अनेक प्रयत्न केले पण त्यांना अखेर अपयश आले.
दरम्यान, आता केंद्रात आणि राज्यातही भाजपचं (BJP) सरकार आल्याने ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Web Title :- Dy CM Devendra Fadnavis | devendra fadnavis accepts charge as dy cm meeting held on obc reservation

हे देखील वाचा :

Tejasswi Prakash Gorgeous Look | तेजस्वी प्रकाशच्या साडीतील मादक अदावर चाहते झाले घायळ, पाहा व्हायरल फोटो…

Compressed Biogas (CBG) | कॉम्प्रेस्ड बायोगॅस इंधनापासून पुणे शहरातील बसेस चालविण्याचे उपक्रमाचे उद्घाटन

Ankita Lokhande Oops Moment | बोल्ड ड्रेसच्या नादात अंकिता लोखंडे झाली Oops Moment ची शिकार, पाहा व्हायरल व्हिडिओ..

Related Posts