IMPIMP

e-SHRAM Portal | ‘या’ सरकारी योजनेत रजिस्ट्रेशन करताच होईल मोठा फायदा, ‘इथं’ जाणून घ्या स्कीम अन् सर्वकाही

by nagesh
e-SHRAM Card | farmers registration on e shram card online e shram card benefits

नवी दिल्ली : वृत्तसंस्था ई-श्रम पोर्टल (eSHRAM Portal) वर आतापर्यंत असंघटित क्षेत्रातील सुमारे 10 कोटी मजूरांनी रजिस्ट्रेशन केले आहे. ई-श्रम पोर्टल (e-SHRAM Portal) सरकारचा अनौपचारिक कार्यबळाचा राष्ट्रीय डेटाबेस बनवण्याचा एक उपक्रम आहे. यामध्ये रजिस्ट्रेशननंतर 2 लाखाचा अ‍ॅक्सीडेंटल विमा कव्हर मिळतो.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

कामगार मंत्रालयाने म्हटले आहे की, सरकारद्वारे राबवण्यात येत असलेल्या विविध सामाजिक सुरक्षा योजनांचा (Social Welfare schemes) फायदा देण्यासाठी असंघटित क्षेत्रातील मजूरांंसाठी राष्ट्रीय डाटाबेस बनवण्यासाठी या वर्षी ऑगस्टमध्ये ई-श्रम पोर्टल (e-SHRAM Portal) सुरू करण्यात आले होते.

मंत्रालयानुसार केंद्रीय मुख्य कामगार आयुक्त (सीएलसी) यांनी म्हटले की, सीएलसी क्षेत्रातील अधिकार्‍यांच्या 100 दिवसांमध्ये संबंधित प्रयत्नामुळे, ई-श्रम पोर्टलवर सुमारे 10 कोटी मजूरांची नोंदणी करण्यात आली आहे. सर्व अधिकार्‍यांना प्रयत्न जारी ठेवण्याची विनंती करण्यात आली आहे. जेणेकरून असा कोणताही मजूर बाकी राहू नये ज्याची नोंदणी झालेली नाही.

29 नोव्हेंबर, 2021 पर्यंत पोर्टलवर सुमारे 9.7 कोटी (9,69,82,091) मजूरांची नोंदणी झाली आहे, ज्यामध्ये एक दिवसापूर्वी जवळपास 15 लाख मजूरांची (14,95,993) वाढ झाली आहे. ई-श्रम पोर्टलवर (e-SHRAM Portal) नोंदणीमध्ये साप्ताहिक वाढ, (किमान मागील 9 आठवड्यापासून) प्रति आठवडा किमान 70 लाख मजूरांची वाढ दर्शवते.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

UAN रजिस्ट्रेशन

जे वर्कर E-shram Portal वर रजिस्ट्रेशन करतात, त्यांना युनिव्हर्सल अकाऊंट नंबर (UAN) अलॉट होतो. हा 12 अंकी नंबर प्रत्येक असंघटित कामगाराला eSHRAM पोर्टलवर नोंदणीनंतर सोपवला जातो. UAN नंबर एक कायस्वरूपी नंबर असतो, म्हणजे तो आयुष्यभर बदलत नाही.

कोण करू शकतात रजिस्ट्रेशन
कुणीही वर्कर जो असंघटित आहे आणि 16-59 वर्ष वयाच्या दरम्यान आहे, तो eSHRAM पोर्टलवर नोंदणीसाठी पात्र आहे.

कोणती कागदपत्र लागतील

1. आधार क्रमांक

2. मोबाइल नंबर, आधार लिंक

3. बँक खाते

कोणता फायदा होईल
केंद्र सरकारने eSHRAM पोर्टल त्यांच्यासाठी विकसित केले आहे, जे Aadhaar शी जोडलेले असंघटित मजूर आहेत. नोंदणीनंतर त्यांना PMSBY अंतर्गत 2 लाखाचे अपघात विमा संरक्षण मिळते.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

भविष्यात असंघटित कामगारांसाठी सर्व सामाजिक सुरक्षांचा लाभ या पोर्टलवरून मिळेल. आपत्कालीन आणि राष्ट्रीय महामारी सारख्या स्थितीत, पात्र असंघटित मजूरांना आवश्यक मदत प्रदान करण्यासाठी या डेटाबेसचा वापर केला जाऊ शकतो.

कसे करावे रजिस्ट्रेशन
एक असंघटित कार्यकर्ता https://eshram.gov.in/ पोर्टलवर जाऊन किंवा जवळच्या सीएससीवर जाऊन आपली नोंदणी करू शकता.
येथे रजिस्ट्रेशन पूर्णपणे मोफत आहे. येथे बँक डिटेल मागितल्या जातील जेणेकरून भविष्यात सुविधांचा फायदा मिळत राहावा.

काय आहे PMSBY
पंतप्रधान सुरक्षा विमा योजना (PMSBY) भारत सरकारची एक अपघात विमा योजना आहे.
जी 18- 70 वर्ष वयोगटातील लोकांसाठी आहे.
अचानक मृत्यू किंवा कायमस्वरूपी अपंगत्वामध्ये 2 लाख आणि अंशता अपंगत्व आल्यास 1 लाख रुपयांचे कव्हर मिळते.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

Web Title :- e-SHRAM Portal | eshram portal registration what is eshram card registration how to register for eshram card

हे देखील वाचा :

Devendra Fadnavis | ‘देवेंद्र फडणवीसांनी 5 वर्षांच्या काळात महाराष्ट्राचं वाटोळं केलं’; ‘या’ नेत्याची खरमरीत टीका

Pune NCP | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दत्तवाडीत विविध शासकीय योजनांच्या कार्डचे वाटप

Pune Crime | कोयते, चॉपर, चाकू विक्रीसाठी आलेल्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडून अटक

Related Posts