IMPIMP

ED Action On Shivsena MLA Pratap Sarnaik | शिवसेनेला ईडीचा दुसरा झटका ! प्रताप सरनाईकांची 11.35 कोटींची मालमत्ता जप्त

by nagesh
ED Action On Shivsena MLA Pratap Sarnaik | ed action on shivsena mla pratap saranaika assets worth rs 11 crore sized

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन  ED Action On Shivsena MLA Pratap Sarnaik | महाविकास आघाडी सरकारमधील (Maha Vikas Aghadi Government) शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्यावर ईडीने (ED) कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये त्यांची 11.35 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. एनएसईएल या घोटाळा प्रकरणात (NSEL Fraud Case) त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली असून शिवसेनेसाठी (Shivsena) हा मोठा धक्का मानला जात आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

या घोटाळ्यामध्ये ठाण्यातील (Thane) दोन जमिनींचा समावेश आहे. या दोन जमिनींची किंमत 11.35 कोटी इतकी असल्याचं सांगितलं जात आहे.
ईडीने यापूर्वीही एनएसईएल प्रकरणात सरनाईक (ED Action On Shivsena MLA Pratap Sarnaik) यांची चौकशी केली होती.
मात्र, त्यानंतर कोणतीही हालचाल पाहायला मिळाली नव्हती मात्र आज अचानक ईडीने धाड मारत कारवाई केली आहे.

प्रताप सरनाईक यांना याआधी ईडीने चौकशीसाठी बोलावलं होतं आणि काही कागदपत्रांची चौकशी केली होती.
त्यांनंतर त्यांच्याविरोधात मनी लॉन्ड्रिंगची केस (Money Laundering Case) दाखल करण्यात आली होती.
सरनाईक यांना अनेक समन्स बजावले होते मात्र ते हजर राहत नव्हते.
सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निर्णयानंतर सरनाईक हे एकदा चौकशीसाठी गेले होते मात्र त्यानंतर आज ईडीने कारवाई केल्याने ठाण्यामध्ये खळबळ उडाली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

दरम्यान, शिवसेनेसाठी हा दुसरा धक्का आहे.
याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे (CM Uddhav Thackeray) मेहुणे श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांच्यावर ईडीने धाड टाकत मोठी कारवाई केली होती.
त्यांचे 11 फ्लॅट ईडीने जप्त केले होते त्यांची किंमत ही 6.45 कोटी इतकी होती.
आता शिवसेना काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Web Title :- ED Action On Shivsena MLA Pratap Sarnaik | ed action on shivsena mla pratap saranaika assets worth rs 11 crore sized

हे देखील वाचा :

Skin Cancer Prevention | ‘या’ 3 गोष्टींची काळजी घेतल्यास त्वचेच्या कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो; जाणून घ्या

Disha Salian Death Case | राणे पिता-पुत्रांच्या अडचणी वाढणार? दिशा सालियानच्या कुटुंबीयांनी उचललं ‘हे’ पाऊल

Pune Crime | थेरगाव येथील अनिकेत चौधरी टोळीतील ‘मोक्का’ गुन्ह्यातील आरोपीला जामीन मंजूर

Related Posts