IMPIMP

ED | ईडीची मोठी कारवाई ! शिवसेना नेते संजय राऊत यांच्या निकटवर्तीयाला अटक

by nagesh
ED Inquiry | eds watch on leaders involved in scams strict action instructions

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन ED | एक हजार 34 कोटी रुपयांच्या जमीन घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचलनालयानं (ED) शिवसेना नेते आणि
खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत (Pravin Raut) यांना अटक (Arrested) करण्यात आली आहे. जमीन
घोटाळ्याप्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे. एचडीआयएलची सहाय्यक कंपनी असलेल्या गुरुआशिष कंस्ट्रक्शनमध्ये (Guruashish
Construction) प्रविण राऊत हे संचालक आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

प्रविण राऊत हे संजय राऊत यांचे नातेवाईक आहेत. एक हजार 34 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप त्यांच्यावर आहे. सक्तवसुली संचलनालयाच्या (ED) पथकाने मंगळवारी प्रविण यांच्याशी संबंधित अनेक ठिकाणी छापेमारी करून त्यांना दक्षिण मुंबईतील (South Mumbai) कार्यालयात चौकशीसाठी नेण्यात आलं होतं. त्यांची अनेक तास चौकशी केली आहे. परंतु, चौकशीला सहकार्य करण्यास नकार दिल्यानंतर प्रविण राऊत यांना अटक केल्याचे समजते.

दरम्यान, यापूर्वी प्रविण राऊत यांचे नाव 2020 साली पीएमसी बँक घोटाळ्यातही आलं होतं. प्रविण राऊत यांच्या पत्नी माधुरी (Madhuri) यांनी 2010 साली शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पत्नी वर्षा (Varsha Raut) यांना 55 लाखांचं व्याजमुक्त कर्ज दिलं होतं. याचा वापर त्यांनी मुंबईतील दादरमध्ये एक फ्लॅट खरेदी करण्यासाठी केला होता. दरम्यान, आता गोरेगाव भूखंडाच्या विक्रीत एफएसआय मध्ये गैरव्यवहार केल्याच्या आरोपांखाली मनी लाँड्रिंगचा (Money Laundering) गुन्हा दाखल केल्यानंतर प्रविण राऊत यांना अटक (Arrested) केली आहे.

 Web Title : ED | ed arrests businessman pravin raut connected to shiv sena mp sanjay raut

हे देखील वाचा :

NCP Prashant Jagtap | पुण्यातील भाजपचे 16 नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर? NCP चे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले…

Rice side effects | भात खाणे आवडते का, एकदा जाणून घ्या यामुळे होणारे नुकसान

Dr Kalyan Gangwal | सुपर मार्केट, किराणा दुकानातून वाईन विक्रीविरोधात जनआंदोलन उभारा : डॉ. कल्याण गंगवाल यांचे जनतेला आवाहन

Sharad Pawar | सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णयावर शरद पवारांचं महत्वाचं विधान, म्हणाले – …तरी वाईट वाटायचं कारण नाही’

Causes of Migrain in Women | महिलांना ‘या’ 4 कारणांमुळे होतो मायग्रेन, जाणून घ्या याची मुख्य लक्षणे आणि बचावाच्या 8 पद्धती

Related Posts