IMPIMP

ED Summons Sanjay Raut | शिवसेनेला आणखी एक धक्का ! संजय राऊतांना ईडीचे समन्स

by nagesh
Sanjay Raut | special pmla court slams ed in sanjay raut bail said ed arrests accused at extraordinary pace but conducts trial at snails pace

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन ED Summons Sanjay Raut | शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे शिवसेनेला (Shivsena) धक्क्यावर धक्के बसताना दिसत आहेत. अशातच शिवसेनेसमोर आणखी एक अडचण निर्माण झाली आहे. शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीकडून (ED) समन्स बजावल्याची माहिती समोर आली आहे. या समन्सनुसार संजय राऊतांना मंगळवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देखील दिले आहेत. दरम्यान, संजय राऊत यांच्यावर कारवाई होणार असल्याच्या चर्चा होताना दिसत आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

ईडीकडून संजय राऊत (ED Summons Sanjay Raut) यांना पत्राचाळ प्रकरणात चौकशी (Patrachal Land Case) करण्यासाठी समन्स पाठवण्यात आले आहे. गोरेगावमधील पत्राचाळ जमीन प्रकरणात 1034 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. यापैकी काही पैसे संजय राऊत यांना मिळाल्याचा आरोप आहे. याच पैशातून संजय राऊत यांनी अलिबागमध्ये भूखंड खरेदी केल्याचा दावा केला होता. या जमिनीची किंमत जवळपास 60 लाखांच्या आसपास असल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर स्थानिक लोकांना धमकावून हे भूखंड कमी पैशात खरेदी केल्याचा आरोप आहे.

दरम्यान, संजय राऊत यांनी यावर एक मोठी प्रतिक्रिया दिली आहे. “मला आताचा समजले ED ने मला समन्स पाठवले आहे. छान.. महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठ्या लढाईत उतरलो आहोत. मला रोखण्यासाठी..हे कारस्थान सुरू आहे. माझी मान कापली तरी मी गुवाहाटीचा मार्ग स्विकारणार नाही. या..मला अटक करा!’ जय महाराष्ट्र! @Dev_Fadnavis, असं म्हणत त्यांनी थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे.

Web Title :- ED Summons Sanjay Raut | ed issues summons to shiv sena leader sanjay raut call for probe tomorrow

हे देखील वाचा :

Pune Crime | किराणा दुकानदारांशी महिलेची बनवाबनवी ! इतर सामानाबरोबर पैसे देण्याचा बहाणा करुन फसवणूक

MLA Ashish Jaiswal | ‘तुम्ही वर्षा सोडलं, मंत्रालयात जात नाहीत, मातोश्रीत कुणाला एन्ट्री नाही, मग राज्य कोण चालवतंय?’; शिंदे गटातील आमदाराचा मुख्यमंत्र्यांना सवाल

Eknath Shinde | ठाकरे सरकारला बहुमत सिध्द करायला सांगा – एकनाथ शिंदे गट

Related Posts