IMPIMP

Eknath Khadse | राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षांसोबत नऊ नगरसेवक 6 वर्षांसाठी निलंबित, एकनाथ खडसेंना मोठा धक्का

by nagesh
Eknath Khadse | eknath khadse statement on ed cbi cid acb raid on opposition leaders treat like enemy

जळगाव : सरकारसत्ता ऑनलाइन  – भुसावळ नगरपालिकेमधील (Bhusawal Municipality) नगराध्यक्ष रमण भोळे (Raman Bhole) यांच्यासह नऊ नगरसेवकांना सहा वर्षासाठी निलंबित (Suspended) करण्यात आले आहे. भुसावळ नगरपालिकेच्या अपात्र नगरसेवकांचा निकाल नगर विकास विभागाने कायम ठेवला आहे. त्यामुळे एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना मोठा धक्का बसला आहे. रमण गोळे हे राष्ट्रवादीचे (NCP) आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे समर्थक होते.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

या निकालामुळे भुसावळच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. नगर विकास मंत्रालयाने सदर निकालाबाबत आदेश पारीत केला आहे. या आदेशान्वये नगराध्यक्ष रमण भोळे, नगरसेवक सविता मकासरे (Savita Makasare), प्रमोद नेमाडे (Pramod Nemade), लक्ष्मी मकासरे (Lakshmi Makasare), मेघा वाणी (Megha Vani), बोधराज चौधरी (Bodhraj Chaudhary), शोभा नेमाडे  (Shobha Nemade), किरण कोलते (Kiran Kolte), शैलजा नारखेडे (Shailaja Narkhede) आणि अमोल इंगळे (Amol Ingle) हे अपात्र ठरले आहेत.

भुसावळ नगरपालिकेचे नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह अमोल इंगळे, लक्ष्मी मकासरे, सविता मकासरे, मेघा वाणी,
बोधराज चौधरी, शोभा नेमाडे ,किरण कोलते, शैलजा नारखेडे आणि प्रमोद नेमाडे यांनी नगरपालिकेचा कार्यकाळ पूर्ण
होण्याच्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत 17 डिसेंबर 2021
रोजी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. यांच्याविरोधात भाजप नगरसेविका पुष्पा बत्रा
(BJP Corporator Pushpa Batra) यांनी नगरसेवकांची अपात्र याचिका दाखल केली होती.
यावर नगर विभागाचे प्रधान सचिव यांच्या सुनावणीअंती ही कारवाई केली गेली.
त्यामुळे एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि राष्ट्रवादी पक्षाला मोठा धक्का लागला आहे.

नगरविकास विभागाने महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अधिनियम 1986,87 च्या कलम 7/3 नुसार या सर्व नगरसेवकांवर कारवाई करण्यात आली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Eknath Khadse | 9 corporators including ncp mayor suspended for 6 years in jalgaon

हे देखील वाचा :

Pune NCP | पुण्यात सामाविष्ट केलेली गावे वगळण्याचा शिंदे-फडणवीसांचा मोठा डाव, राष्ट्रवादीने केला गंभीर आरोप

Myths And Facts During Pregnancy | गरोदरपणातील खाणे-पिणे आणि त्यासंबंधीत काही गैरसमज आणि त्यांचे सत्य जाणून घ्या!

Bhaskar Jadhav | नारायण राणेंविरोधात शिवराळ भाषा वापरणं भास्कर जाधवांना भोवणार?, कुडाळ पोलीस ठाण्यात FIR

Related Posts