IMPIMP

Eknath Khadse | मी 50 खोके घेऊन दुसर्‍या पक्षात जाणारा माणूस नाही, एकनाथ खडसे म्हणाले – अमित शाह आणि फडणवीसांना मी भेटणारच… माझ्यासोबत…

by nagesh
 Eknath Khadse | eknath khadse statement on speculation of joining bjp and meeting with amit shah

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन– राष्ट्रवादीचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे काही दिवसांपूर्वी त्यांच्या स्नूषा रक्षा खडसे (Raksha
Khadse) यांच्यासमवेत दिल्लीत गृहमंत्री अमित शहांच्या (Home Minister Amit Shah) भेटीसाठी गेले होते. यानंतर खडसे पुन्हा भाजपामध्ये (BJP)
जाणार अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र, त्यावर स्पष्टीकरण देऊन खडसे यांनी विषय संपवला होता. मात्र आज गिरिश महाजन (Girish Mahajan)
यांनी खडसेंना डिवचले. अमित शाहांनी एकनाथ खडसेंना (Eknath Khadse) भेट नाकारली, त्यांना तीन तास कार्यालयाबाहेर प्रतीक्षा करायला लावली,
खडसे म्हणत होते एकत्र बसून विषय मिटवू, खडसेंनी सबुरीने घ्यावे, अशी टीका महाजनांनी केली होती. यावर आता खडसे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

जळगावमध्ये पत्रकारांशी बोलताना एकनाथ खडसे म्हणाले, मी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासमवेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भेटणार आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचीही मी भेट घेणार आहे. यामध्ये कोणताही राजकीय विषय नाही. अन्य एका विषयासंदर्भात मला दोघांशीही चर्चा करायची आहे. अमित शाहांना भेटायला जाताना शरद पवारच माझ्यासोबत असणार आहेत. त्यामुळे मी भाजपात जाणार आहे, अशा अफवांवर विश्वास ठेऊ नका. मी 50 खोके घेऊन दुसर्‍या पक्षात जाणारा माणूस नाही.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

एकनाथ खडसे (Eknath Khadse) पुढे म्हणाले, अमित शाहांची भेट घेण्यासाठी मी त्यांच्या कार्यालयाबाहेर तीन तास थांबलो, असे वक्तव्य गिरीश महाजनांनी केले आहे. ही माहिती रक्षाताई खडसेंनी आपल्याला दिल्याचा दावा गिरीश महाजनांनी केला. मात्र, याबाबत मी रक्षाताईंशी चर्चा केली, पण त्यांनी अशी कुठलीही माहिती दिली नाही. त्यांनी केवळ एवढेच सांगितले की, आम्ही अमित शाहांची भेट घ्यायला गेलो होतो. पण आमची भेट झाली नाही.

खडसे म्हणाले, अमित शाहांची भेट घेण्याबाबतची पूर्वकल्पना मी शरद पवारांना आधीच दिली होती.
गर्दीमुळे तुमची भेट झाली नसेल तर मी स्वत: तुमच्यासोबत येतो.
आपण दोघे जाऊन अमित शाहांची भेट घेऊ, असे शरद पवारांनी मला सांगितले आहे.
त्यामुळे याबाबत गैरसमज होण्याचा प्रश्नच नाही, असा खुलासा खडसे यांनी केला.

Web Title :- Eknath Khadse | eknath khadse statement on speculation of joining bjp and meeting with amit shah

हे देखील वाचा :

Shivendra Raje Bhosale | आपली कॉलर आपल्या मानेवरच चांगली दिसते शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंना टोला

Nashik ACB Trap | वैद्यकीय बिलाची रक्कम मंजूर करुन देण्यासाठी 30 हजार रुपये लाच मागणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील लिपिकावर एसीबीकडून FIR

Pune Crime | खडकीच्या हद्दीत खूनाचा प्रयत्न करणार्‍यांना शिवाजीनगर परिसरातून अटक

Related Posts