IMPIMP

Eknath Khadse | जळगावच्या बोदवड नगरपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा; एकनाथ खडसेंना धक्का

by nagesh
Eknath Khadse | jalgoan nagar panchayat election result shiv sena has majority in jalgoan bodwad nagar panchayat setback to eknath khadse bjp win 1 seat

जळगाव : सरकारसत्ता ऑनलाइन– Eknath Khadse | राज्यातील नगरपंचायतीचे निकाल हाती येत आहेत. जळगावच्या बोदवड नगरपंचायत निवडणुकींच्या (Jalgaon Nagar Panchayat Result) जागांचे निकाल आता समोर आले आहेत. याठिकाणी शिवसेनेने (Shiv Sena) आपली बाजी मारली आहे. तर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे या निकालांमध्ये एका जागेवर राष्ट्रवादी (NCP) आणि भाजपाला (BJP) समसमान मते मिळाली. त्यामुळे ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली. त्यात भाजपाचे विजय शिवराम बडगुजर (Vijay Shivram Badgujar) हे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे एका जागेवर भाजपला समाधान मानावे लागत आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

बोदवड नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेने 9 जागांवर विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला 7 तर भाजपला 1 जागा मिळाली आहे. बोदवड नगरपंचायतील एकनाथ खडसेंच्या (Eknath Khadse) गटात गळती लागली आहे. विशेष म्हणजे तेथील शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील (Shiv Sena MLA Chandrakant Patil) यांच्या नेतृत्वात शिवसेनेनं आपली विजयाची कमान रोवली आहे.

दरम्यान, ‘ईश्वर चिठ्ठी’नं भाजपाला खाते तरी उघडता आले. नाहीतर भाजपाच्या पारड्यात एकही उमेदवार नसल्याचं चित्र उभं होतं, मात्र ऐन वेळ भाजपला संधी मिळाली आहे. कारण एका जागेवर राष्ट्रवादी आणि भाजपाला समसमान मते मिळाली. त्यामुळे ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली. त्यात भाजपा उमेदवार निवडून आले. भाजपाचे विजय शिवराम बडगुजर यांचं ईश्वर चिठ्ठीने भाग्य उजळलं आहे.

Web Title: Eknath Khadse | jalgoan nagar panchayat election result shiv sena has majority in jalgoan bodwad nagar panchayat setback to eknath khadse bjp win 1 seat

हे देखील वाचा :

12 BJP MLAs Suspension | भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाच्या याचिकेवरील निर्णय सुप्रीम कोर्टाने ठेवला राखून, ठाकरे सरकारवर ओढले ताशेरे

LIC Kanyadan Policy | LIC च्या कन्यादान पॉलिसीत दररोजच्या गुंतवणुकीवर मिळेल मोठी रक्कम, मिळू शकतात जवळपास 27 लाख

OBC Reservation Maharashtra | सर्वाेच्च न्यायालयाचा राज्य सरकारला मोठा दिलासा ! ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा

Dehu Nagar Panchayat Result | देहू नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचं वर्चस्व; भाजपला धक्का

LIC Saral Pension Scheme | एलआईसीच्या ‘या’ पॉलिसीमध्ये दर महिना मिळेल 12,000 रुपयांची पेन्शन, भरावा लागेल एकदाच प्रीमियम

Pune Crime | कुख्यात निलेश घायवळ टोळीमधील 6 गुन्हेगारांवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची ‘मोक्का’ कारवाई

Mumbai Local Mega Block | मध्य रेल्वेवर 72 तासांचा मेगा ब्लॉक; 4 ते 6 फेब्रुवारी दरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम

Related Posts