IMPIMP

Eknath Khadse | ‘जरा गृहमंत्रिपदाचा हिसका दाखवा, भाजपच्या 2 ते 4 नेत्यांना…”; नाथाभाऊंचा दिलीप वळसे-पाटलांना सल्ला (Video)

by nagesh
Eknath Khadse | maharashtra home minister dilip walse patil ncp sharad pawar in jalgaon eknath khadse on bjp leader

जळगाव : सरकारसत्ता ऑनलाइन Eknath Khadse | राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांचं धाडसत्र चालू असलेलं पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते (Eknath Khadse) एकनाथ खडसे यांनी भाजपवर (BJP) निशाणा साधताना राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे – पाटील (Dilip Walse – Patil) यांना सल्ला दिला आहे.

वळसे पाटील यांना मी अनेकदा गृहमंत्रीपदाचा हिसका, इंगा दाखवा असं सांगत असतो. यांची शेकडो प्रकरणं आहेत. दोन चार लोकांना वर्षापूर्वी आत टाकलं असतं तर ही परिस्थिती आली नसती, असं एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद (Sharad Pawar) पवार जळगावच्या (Jalgaon) दौऱ्यावर असून एका आजोजित कार्यक्रमात खडसे बोलत होते.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

जे सत्य आहे ते करा, कोणाला छळू नका, द्वेषाचं राजकारण करु नका.
पण ज्यांनी केले आहे त्यांना भोगायला लावा, तर मग ही परिस्थिती निर्माण होणार नाही, असंही खडसे म्हणाले.
त्यासोबतच खडसेंनी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री अनिल देशमुखांवर (Anil Deshmukh) पडलेल्या धाडींवरूनही भाजपवर निशाणा साधला.

दरम्यान, काही कारण नसताना अनिल देशमुखांच्या घरावर 100 पेक्षा जास्त धाडी पडतात.
आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. मलाही उगाच अडकवण्याचा प्रयत्न झाला.
पण मी जेलमध्ये गेलो तर तुम्हालाही घेऊन बुडणार हे लक्षात ठेवा, असा इशाराही खडसेंनी दिला आहे.

Web Title :- Eknath Khadse | maharashtra home minister dilip walse patil ncp sharad pawar in jalgaon eknath khadse on bjp leader

हे देखील वाचा :

Police Inspector Transfer | पिंपरी चिंचवडमधील 5 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या ! गुन्हे शाखा, वाकड, हिंजवडी, शिरगाव ठाण्यात नियुक्त्या; जाणून घ्या नावे

Monsoon 2022 Forecast | खुशखबर ! मान्सून यंदा 99 टक्के बरसणार – हवामान विभाग (IMD)

Pune Cyber Crime | मित्राच्या सर्व कुटुंबाला कोरोना झालाय, पैसे पाठव ! अमेरिकेतील भावाच्या फेसबुकवरील फोटो प्रोफाईलला लावून एकाचवेळी पुणे व दिल्लीत सायबर चोरट्यांनी घातला गंडा

Related Posts